well subsidy: विहीरसाठी मिळणार 4लाख अनुदान शासन निर्णय

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

एकदा का अर्ज पूर्ण लिहून झाला की त्यासोबत अर्जदारानं पुढील कागदपत्रं जोडायची आहेत.

1.सातबाराचा ऑनलाईन उतारा

2.8-अ चा ऑनलाईन उतारा

3.मनरेगा जॉब कार्डची प्रत

4.सामुदायिक विहीर घ्यायची असल्यास सर्व जण मिळून 40 गुंठे जमीन सलग असल्याचा पंचनामा आणि समोपचारानं पाणी वापराबाबतचं सर्वांचं करारपत्र.

अर्ज कुठे व कसा करायचा?

मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरीसाठी सध्या तरी ग्रामपंचायतीकडे अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्जप्रणाली सुरू झाल्यानंतर शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

शासन निर्णयात या अर्जासाठीचा नमुना दिला आहे, तो तुम्ही खाली पाहू शकता. अशापद्धतीनं साध्या कागदावर तुम्ही अर्ज करू शकता.

अर्ज पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला संमतीपत्र सुद्धा द्यायचं आहे. संमतीपत्राचा नमुना शासन निर्णयासोबत जोडला आहे. शासन निर्णयाची लिंक इथं देत आहोत.

अर्ज आणि त्यासोबतची कागदपत्रं अर्जदारानं ग्रामपंचायत कार्यालयात सबमिट करायची आहेत. हा अर्ज ऑनलाईन भरण्याचं काम ग्रामपंचायतीचं असेल. ग्रामपंचायतीनं शेतकऱ्यांना पोच पावती द्यायची आहे.

विहिरीच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर सर्वसाधारण परिस्थितीत विहीर पूर्ण करण्याचा कालावधी 2 वर्षांचा आहे. अपवादात्मक परिस्थिती (दुष्काळ, पूर, इ.) विहीर पूर्ण करण्याचा कालावधी जास्तीत जास्त 3 वर्षांचा राहिल.

आर्थिक मदत किती?

महाराष्ट्र हे मोठं राज्य असून प्रत्येक भागाची स्थानिक व भौगोलिक परिस्थिती भिन्न आहे. त्यामुळे राज्यासाठी विहिरीचा एकच आकार व दर निश्चित करणं शक्य नाही.

त्यामुळे मग विहिरीच्या कामासंबंधी आर्थिक व तांत्रिक बाबी निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाईल.

त्यानुसार, प्रत्येक जिल्ह्यात विहिरीसाठी 4 लाख रुपयांपर्यंत अनुदान सरकारनं मंजूर केलं आहे.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Home page

error: Content is protected !!