Newyork city आपल्याला माहिती आहे अमेरिकेतील न्यूयॉर्क हे शहर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. या शहरातील गर्दी आणि तेथील इमारती यांमुळे शहराचं वजन वाढत असल्याचं नासाने म्हटलं आहे. यामुळेच, येत्या काही वर्षांमध्ये हे शहर पाण्याखाली जाऊ शकतं, असा गंभीर इशारा नासाने दिला आहे.
या भागांना बसणार फटका
न्यूयॉर्कमधील लागार्डिया एअरपोर्ट, आर्थर अॅश स्टेडियम आणि कोनी आयलँड या ठिकाणांना सर्वात आधी फटका बसणार आहे. लागार्डिया आणि आर्थर स्टेडियम या दोन्ही जागा अनुक्रमे 3.7 आणि 4.6 मिलीमीटर प्रतिवर्ष या वेगाने जमीनीखाली जात आहेत.
सध्या शहराचं वजन किती?
न्यूयॉर्क शहराचं वजन हे 1.7 ट्रिलियन पाउंड असल्याचं एका रिपोर्टमध्ये समोर आलं होतं. या शहरात 10 लाखांहून अधिक मोठ्या इमारती आहेत. संयुक्त राज्य भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने या वर्षीच्या सुरुवातीला हे सर्वेक्षण केलं होतं.
किनारी भागात मोठा धोका
