शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 25 टक्के वाढीव पिक विमा मिळणार या जिल्ह्यांच्या याद्या झाल्या जाहीर पहा
crop insurance list राज्यात अनेक ठिकाणी पावसाने मारलेली दांडी, २१ दिवसांपेक्षा जास्त खंड पाहता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 25 टक्के वाढीव पिक विमा जमा होणार आहे त्यासंदर्भात माहिती आपण या ठिकाणी जाऊन घेणार आहोत.
आता शेतकऱ्यांना कोणत्याही पिकाचा विमा फक्त एका रुपयात काढता येणार आहे आणि उर्वरीत शेतकरी हिस्सा शासन भरणार आहे. आणि ही पुढील तीन वर्षासाठी लागू असणार आहे. त्यामुळे जवळपास राज्यातील कोट्यावधी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविला आहे.
विमा कंपन्यांनी पावसाच्या खंडा बाबतीत विभागीय आयुक्ताकडे अपील फेटाळण्यात आल्याने मराठवाड्यातील सहा जिल्ह्यामधील सुमारे 5 हजार गावातील शेतकऱ्यांना विम्याची 25 टक्के वाढीव रक्कम दिवाळीपूर्वीच मिळणार असल्याबाबत माहिती आली आहे.
हे देखील वाचा : शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 रुपये विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या दिवशी जमा होणार
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 25 टक्के विमा दिवाळीपूर्वी जमा करण्याचे आदेश
मराठवाड्यातील पिकाची आणेवारी अद्याप ठरलेली नाही ऑक्टोंबर अखेरनंतर उंबरठा सुत्रनुसार आणेवारी ठरेल बीडमधील अनेक मंडळातील पावसाच्या खंडाबाबत विमा कंपन्यांन अपील केले होते.
इतर जिल्ह्यातीलही काही अपील होते ते सगळे फेटाळण्यात आले ४६५ मंडळापैकी ज्या ठिकाणी पावसाचा खंड होता तेथील शेतकऱ्यांना 25 टक्के वाढीत पिक विमा देण्याचा आदेश विमा कंपनीला देण्यात आला आहे.
जिल्ह्याची यादी पहा
बीड
नांदेड
छत्रपती संभाजीनगर
जालना
लातूर
परभणी
धाराशिव
हिंगोली
या जिल्ह्यातील सुमारे 5 हजार गावांना 25 टक्के वाढीव पिक विमा दिवाळीपूर्वी मिळणार आहे.
यादीत नाव पहा