Gold Price Today: सध्या दिवाळीचा उत्साह ओसांडून वाहत आहे. आनंदाचे क्षण आहेत. पै-पाहुण्यांची गर्दी होत आहे. सराफा बाजारात पण गर्दी झाली आहे. धनत्रयोदशीला सोने-चांदीच्या किंमती वाढलेल्या असतानाही ग्राहकांनी खरेदीचा नवीन रेकॉर्ड केला.

भावात मोठी वाढ झाली असतानाही भारतीय सराफा पेठा गजबजलेल्या होत्या. ग्राहकांनी गेल्यावर्षीचा विक्रम मोडीत काढला. त्यानंतर सोने-चांदीत नरमाई आली. भावात चांगलीच घसरण झाली. धनत्रयोदशीला ज्यांना सोने-चांदीची खरेदी (Gold Silver Price Today 12 November 2023) करता आली नाही. त्यांना शनिवारी स्वस्तात मौल्यवान धातूची खरेदी करता आली. अशी आली सोने-चांदीत स्वस्ताई…

सोने असे झाले स्वस्त

नोव्हेंबर महिन्यात सोने-चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. भावात चांगलीच घसरण झाली. या आठवड्यात पण धनत्रयोदशी वगळता सोन्यात घसरण होती. 31 ऑक्टोबरपासून कालपर्यंत सोन्यात 1650 रुपयांची स्वस्ताई आली. या आठवड्यातील चार दिवसांमध्ये, सोन्यात 880 रुपयांची घसरण झाली होती. 10 नोव्हेंबर रोजी सोन्यात 300 रुपयांची दरवाढ झाली. 11 नोव्हेंबर रोजी 450 रुपयांनी भाव उतरले. आता 22 कॅरेट सोने 55,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

 

सोन्याचा सध्याच्या लाईव्ह दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

चांदी 1000 रुपयांची घसरण

या आठवड्यात 6 नोव्हेंबर रोजी चांदी 200 रुपयांनी महागली. 7 नोव्हेंबर रोजी किंमती 700 रुपयांनी घसरल्या. 8 नोव्हेंबर रोजी 1000 रुपयांची स्वस्ताई आली. तर 9 नोव्हेंबर रोजी किंमती 300 रुपयांनी उतरल्या. 10 नोव्हेंबर रोजी चांदीने घसरणीला ब्रेक लावला. चांदीत 800 रुपयांची दरवाढ झाली. 11 नोव्हेंबर रोजी एक हजारांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 73,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय?

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 60,240 रुपये, 23 कॅरेट 59,999 रुपये, 22 कॅरेट सोने 55,180 रुपये झाले. 18 कॅरेट 45,180 रुपये, 14 कॅरेट सोने 35,240 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदी घसरली. एक किलो चांदीचा भाव 70,416 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

सोन्याची किंमती एका मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

 

 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!