Crop insurance या जिल्ह्यातील ७ लाख ७० हजार शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रमी विमा देण्याचा शासनाचा मोठा निर्णय

शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रमी विमा देण्याचा मोठा निर्णय आज मंत्रीमंडळ मंडळ बैठकीत घेण्यात आला आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
यामध्ये फक्त बीड जिल्ह्यातील ७ लाख ७० हजार शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रमी पिक विमा वितरीत करण्यात येणार आहे.

बीड जिल्ह्यातील 7 लाख 70 हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रीम पीक विमा रक्कम मिळणार आहे. भारतीय पीक विमा कंपनीकडून यासाठी एकूण 241 कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वर्ग करण्यात येईल. यासाठी राज्याचे राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पाठपुरावा केला होता.

हेही वाचा: उर्वरीत या तालुक्यांना नुकसानभरपाई जाहीर यादी पहा

बीड जिल्ह्यात सुरुवातीच्या व मध्य खरीप हंगामात पावसाने दीर्घकाळ खंड दिल्याने शेतकऱ्यांचे व विशेष करून सोयाबीन उत्पादकांचे नुकसान झाले. त्याचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनास विमा कंपनीला 25 टक्के अग्रीम पीक विमा देण्याच्या अधिसूचना काढाण्यासाठी कृषीमंत्री श्री.मुंडे यांनी सूचना दिल्या.

आज अखेरीस भारतीय पीक विमा कंपनीने आक्षेप मागे घेतले असून बीड जिल्ह्यातील 7 लाख 70 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट अग्रीम 25 टक्के पीक विमा वितरित करण्यात येणार आहे व यासाठी विमा कंपनीने 241 कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई रक्कम निश्चित केली आहे.

दिवाळीपूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम मिळाला नाही तर आपणही दिवाळी साजरी करणार नाही, अशी भूमिका धंनजय मुंडे यांनी याआधीही जाहीर केली होती, अखेर त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये पण आनंदाचे वातावरण आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!