Petrol Diesel Prices: महाराष्ट्रात पेट्रोलच्या किंमतीत मोठी घसरण, पाहा काय आहेत आजचे दर जाणून घ्या?
Petrol Diesel Prices: कच्च्या तेलाच्या किमती सतत बदलत असतात आज कमी झाल्याचं दिसत आहेत. आज ब्रेंट क्रूड 77.42 डॉलरवर विकले जातेय. भारतात तेल विपणन कंपन्यांनी फार कमी राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलल्या आहेत. crude oil
पेट्रोल डिझेलचे तुमच्या शहरातील आजचे दर पहा
महाराष्ट्रात पेट्रोल 1 रुपये तर डिझेल 97 पैशांनी स्वस्त विकले जातेय. हिमाचल प्रदेशमध्ये पेट्रोल 19 पैशांनी तर डिझेल 17 पैशांनी स्वस्त झाले आहे.याशिवाय राजस्थान आणि झारखंडमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किंचित घट झाली आहे. मध्य प्रदेशात पेट्रोल 30 पैशांनी तर डिझेल 28 पैशांनी महागले आहे. उत्तराखंड, तामिळनाडू आणि गुजरातमध्ये पेट्रोल आणि डिझेल महागले आहे.
चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 90.08 रुपये प्रति लिटर
– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
– कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.74 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर
केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी; 11.80 रुपयांनी स्वस्त होणार पेट्रोल? असा आहे सरकारचा प्लॅन
पेट्रोल डिझेलचे तुमच्या शहरातील आजचे दर पहा
अशा प्रकारे तुम्ही आजचे लेटेस्ट दर जाणून घेऊ शकता
पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर तुम्हाला एसएमएसद्वारेही कळू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक 9224992249 या क्रमांकावर RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड लिहून 9223112222 या क्रमांकावर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड टाइप करून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.