इस्राइलचा मोठा निर्णय! मुंबईवर हल्ला करणारी ‘लष्कर-ए-तोयबा’ दहशतवादी संघटना घोषित

मुंबईवर २६/११ हल्ल्याचा सूत्रधार असणाऱ्या लष्कर-ए-तोयबाला दहशतवादी संघटना म्हणून इस्राइलकडून घोषित करण्यात आलं आहे. 26/11 च्या घटनेच्या स्मृतीदिनाच्या काही दिवसाआधी हा निर्णय घेण्यात आला आहे.

इंडिया टूडे या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (Israel designates Lashkar e Taiba as terror organization ahead of anniversary of 26 11 attacks)

२६/११ मुंबईवरील हल्ल्याच्या १५ व्या स्मृतीदिनाआधी हा निर्णय इस्राइल सरकारने घेतला आहे. इस्राइल सरकारने म्हटलंय की, मुंबईवर झालेल्या हल्ल्याच्या १५ व्या स्मृतीदिनाच्या पार्श्वभूमीवर लष्कर ए तोयबाचा समावेश दहशतवादी संघटनेच्या यादीमध्ये करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.

इस्राइल सरकारने स्पष्ट केलंय की, भारताकडून याबाबत कोणतीही मागणी आलेली नव्हती. इस्राइलने लष्कर ए तोयबासंबंधी सर्व माहिती तपासली. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पार पाडण्यात आल्यानंतर दहशतवादी संघटना म्हणून यादीत समावेश करण्यात आलाय.

Home

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!