बॅटरी चार्ज फवारणी पंप मिळविण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज Battery pump

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवते यामध्येच एक बॅटरी चार्ज फवारा आता शेतकऱ्यांना मोफत मिळणार आहे जाणून घेवूयात बॅटरी संचलित फवारणी पंप Battery pump संदर्भात सविस्तर माहिती. कापुस, सोयाबीन तूर हरभरा ऊस अशा भाजीपाला पिके अशा पिकांवर औषध फवारणी करण्यासाठी शेतकरी बांधवाना फवारणी पंपाची आवश्यकता असते.

शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा खरेदी करण्यासाठी अगोदरच शेतकरी बांधवांकडे पैसे नसतात परंतु औषध फवारणी करायची असेल तर पंप घ्यावाच लागतो.

बॅटरी संचलित फवारणी पंप मिळविण्यासाठी ऑनलाईन करावा लागेल अर्ज

जर एखाद्या शेतकऱ्याला फवारणी पंप नसेल तर ज्यांच्याकडे पंप आहे त्यांच्याकडून औषधांची फवारणी करून घ्यावी लागते यासाठी त्यांना पैसे द्यावे लागतात त्यामुळे शेतकरी शासनाच्या या योजनेतून बॅटरीवर ऑटोमॅटिक चार्ज फवारा पंप मिळवू शकतात.

तुम्हाला स्वतः औषध फवारणी करायची असेल मात्र तुमच्याकडे औषध फवारणी करण्यासाठी पंप नसेल तर तुम्हाला आता शासकीय अनुदानावर मोफत बॅटरीवर चालणारा पंप मिळणार आहे.

बॅटरीवर चालणारा पंप अनुदानावर मिळविण्यासाठी अर्ज कसा करावा या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

अनुदानावर मिळेल फवारणी पंप Battery pump

बॅटरीवर चालणारा औषध फवारणी पंप खरेदी करायचा असेल तर मार्केटमध्ये यासाठी पैसे द्यावे लागतात. परंतु हाच औषध फवारणी पंप तुम्हाला शासकीय अनुदानावर मिळतो.

कापूस सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पिक पद्धतीस चालना देवून शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ करून कापूस सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

 

विहिरीसाठी मिळणार 4 लाख अनुदान येथे करा अर्ज पहा प्रक्रिया

 

या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात राबविण्यात येत आहे.

शासकीय अनुदानावर औषध फवारणी पंप खरेदी करण्यासाठी तुम्हाला अगोदर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. हा ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

औषध फवारणी करण्यासाठी अनेक पंप असतात परंतु बॅटरी संचलित फवारणी पंप  असेल तर शेतामध्ये फवारणी करणे खूपच सोपे जाते.

बॅटरीवर चालणारा औषध फवारणी पंप खरेदी करण्यासाठी महाडीबीटी या वेबपोर्टलवर अर्ज करावा लागतो. केवळ महाडीबीटी या वेब पोर्टलवर अर्ज करा असे म्हणून चालणार नाही तर या संदर्भात तुम्हाला अगदी सविस्तर माहिती मिळावी यासाठी आम्ही बांधील आहोत खालील दिलेल्या लिंकवर फार्मर रेजिस्ट्रेशन करून लाँगिन करा आणि त्याद्वारे अर्ज करू शकता त्यासाठी तुम्हाला सातबारा आठ-अ, बँक पासबुक, इत्यादी कागदपत्रं लागू शकतात या आधारे अर्ज सादर करता येतो.

अर्ज करण्याची लिंक

अशा पद्धतीने तुम्ही फवारणी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता आणि तुमचा अर्ज सबमिट झाल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल वर मेसेज पाठवला जाईल.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

Home 🏠

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!