खुशखबर : आता शेतकऱ्यांना मिळणार नांगर, इंजन, ताडपत्री, कडबाकुट्टी, तेही 50 टक्केची सवलतीने

Agricultural implements subsidy scheme 2024 : जिल्हा परिषद सेस फंडातून शेतकऱ्यांना पीक संरक्षण औजारे व उपकरणे, ट्रॅक्टर चलित औजारे, कृषी सिंचनासाठी सुधारित औजारे साधने ५० टक्के मर्यादित अनुदानावर डीबीटी तत्त्वावर देण्यात येणार आहेत.
यासाठी शेतकऱ्यांनी ६ ऑगस्ट २०२४ पर्यंत पंचायत समिती स्तरावर अर्ज करण्याचे आवाहन कृषी विकास अधिकारी नंदकुमार पाचकुडवे यांनी केले आहे.

या योजनेमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अत्यल्पभूधारक व महिला शेतकरीयांना प्राधान्य राहील. दरम्यान, कृषी योजनांचा फायदा घेणाऱ्या इच्छुक शेतकऱ्यांनी स्वतःचा सातबारा, आठ अ, आधारकार्ड, बैंकपासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, तसेच लाभार्थी अनुसूचित जाती,अनुसूचित जमातीचे असल्यास जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांग लाभार्थीसाठी दिव्यांगत्वाच्या दाखल्याची झेरॉक्स प्रतीसह संबंधित पंचायत समितीकडे अर्ज करावेत.

लाभार्थ्यांची निवड केल्यानंतर शेतकऱ्यांनी एक महिन्याच्या आत खुल्या बाजारातून अधिकृत विक्रेत्याकडून आपल्या पसंतीची अवजारे खरेदी करावी लागतील

पाण्याच्या जोरदार प्रवाहात रायगड किल्ल्याच्या पायऱ्यांवर अडकले पर्यटक, पाहा भितीदायक व्हिडिओ

खरेदी करावयाची अवजारे अधिकृत सक्षम तपासणी संस्थांनी परीक्षण करून ती बीआयएस अथवा अन्य संस्थांनी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार, तांत्रिक निकषानुसार असावीत, असेही जिल्हा परिषदेने शेतकऱ्यांना आवाहन करताना कळविले आहे.

 

हुल्लडबाजी अंगलट अख्ख कुटुंबच गेलं पाण्यात वाहून Viral Video

 

५ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची संधी
औजारांसाठी जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लक्ष्यांकानुसार सोडत पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. मंजूर औजारांचे अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बैंक खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारे अदा करण्यात येईल.

तरी इच्छुक शेतकऱ्यांनी ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत संबंधित पंचायत समिती कार्यालयाकडे परिपूर्ण कागदपत्रांसह अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विकास अधिकारी पाच कुडवे यांनी केले आहे.

सेस फंडातून योजनांसाठी खर्च
जिल्हा परिषदेच्या सैस फंडातून शेतकऱ्यांसाठी नी पिस्टन सो पंप, नॅपसॅक बॅटरी ऑपरेटेड स्प्रेपंप, ब्रश कटर, सोलार इन्सेक्ट ट्रॅप,रोटाव्हेटर, पल्ठी नांगर, रोटरी टिलर व विडर, पेरणी यंत्र, कल्टी व्हेटर, ५ एच पी सबमर्सिबल पंपसंच, डिझेल इंजिन, कडबाकुट्टी, ताडपत्री, स्लरी इत्यादी साधने ५० टक्के मर्यादित अनुदानावर डीबीटी तत्त्वावर देण्यात येणार आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!