Sarpanch Remuneration: सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

मुंबई : सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. त्याचबरोबर ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी या पदांबाबतही महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात माहिती सविस्तर सुत्रांनी याबाबत माहिती दिली आहे.

महाजन यांनी सांगितलं की, “राज्यातील सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट करण्यात आलं आहे. तसंच आता ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदं विलीन करुन हे एकच पद करण्यात आलं आहे. तसंच ज्या ग्रामपंचायतींचं वार्षिक उत्पन्न ७५ हजार आहे, त्यांना १० लाखांपर्यंत निधीची वाढ करण्यात आली आहे. तसंच ग्रामीण गृहनिर्माण योजनेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात २० टक्के वाढ करण्यात आली आहे” Latest Maharashgtra Cabinet Decions

आता दरमहा किती मानधन ?

राज्यातील सरपंच आणि उपसरपंचाच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. या बाबत अधिक माहिती देताना भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, आज कॅबिनेटमध्ये राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 2 हजार पर्यंत आहे त्या सरपंचाचे मानधन 3 हजारवरुन 6 सहाहजार करण्यात आले आहे. तर उपसरंपचाचे मानधन हे 1 हजारवरुन 2 हजार करण्यात आले आहे.

तसेच ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 2 हजार ते 8 हजारपर्यंत आहे त्या सरपंचाचे मानधन 4 हजारवरुन 8 हजार तर उपसरपंचाचे मानधन पंधराशेवरुन 3 हजार रुपये इतके करण्यात आले आहे. ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या 8000 पेक्षा जास्त आहे त्या सरपंचाचे मानधन 5 हजारवरुन 10 हजार, तर उपसरपंचाचे मानधन 2 हजारवरुन 4 हजार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या मानधनवाढीमुळे राज्यशासनावर वार्षिक 116 कोटी रुपयांचा आर्थीक भार येणार असल्याचे माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली आहे. तर राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असतानाच मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याने राज्यातील सरपंच आणि उपसरपंचामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Grampanchayat gr राज्य सरकारचा मोठा निर्णय सरपंचांना पाळावे लागणार नियम जाणुन घ्या शासन निर्णय

Home 🏠 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!