Mahadbt Anudan : शासनाच्या कुठल्याही योजना (Agriculture Scheme) अतिवृष्टी, पीकविमा अनुदान असेल पिक विमा असेल, बाल संगोपन योजना, निराधार अनुदान राज्य शासन, केंद्र शासनाच्या माध्यमातून वैयक्तिक लाभार्थ्यांना मानधन अनुदान देणाऱ्या ज्या काही योजना आहेत.
या योजनांचा लाभ देण्यासाठी आधार अनिवार्य करण्यात आले आहे. या संदर्भातील एक महत्वाची अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.
अशा प्रकारे सर्व प्रकारच्या योजना या अंतर्गत कव्हर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दरम्यान डीबीटीच्या माध्यमातून दिले जाणारे अनुदान चुकीच्या व्यक्तीच्या हातात जात नाही ना? याची शहानिशा करण्यासाठी आणि मिळणारे अनुदान योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात या राजपत्राच्या माध्यमातून आता निर्देश देण्यात आलेले आहेत.