Land record सध्या वाढती लोकसंख्या आणि धावपळीच्या युगामध्ये शेतजमीन हा विषय वादाचा मुद्दा झाला आहे. बहुतांशी वाद हे शेतजमिनीचे असतात शेती आणि शेतजमिनीवरुन मोठ्या प्रमाणात मतभेद पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात भांडणे होऊन प्रकरण पोलिस आणि न्यायालयापर्यंत जाते.
एकत्र कुटुंब पध्दत अगदी कमी प्रमाणात राहिली आहे. त्यामुळे शेती करण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. नवीन पिढी शिक्षण आणि नोकरी निमित्त शहरात जाऊ लागले आहेत. असे असताना शेत जमीन कोणी करायची? तसेच शेतीतून पिकलेल्या उत्पादनाची विभागणी कशी करायची हा एक प्रश्न कायम आहे. त्यात बऱ्याच लोकांना खातेफोड पद्धत कशी आहे हे माहित नाही. खाते फोड म्हणजे एक प्रकारे जमिनीची वाटणी केली जाते. तसेच खाते फोड केल्याशिवाय सरकारी अनुदान आणि योजनांचा लाभ मिळत नाही. मग आता ही खातेफोड कशी केली जाते? हेच आपण जाणून घेणार आहोत.
खाते फोड म्हणजे काय?
शेतीतील वाद मिटवण्यासाठी खातेफोड ही केली जाते. महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85 नुसार जमिनीचे खाते फोड केली जाते. यासाठी संबंधीत कुटुंबातील सदस्यांशी चर्चा केली जाते. एकदा अंतिम निर्णय ठरला की लगेच कच्चा आराखडा तयार केला जातो.
जमीन खातेफोड प्रक्रियेमध्ये जेवढे जमीनधारक व्यक्ती आहेत. त्यांच्या मुलांची संमती आवश्यक असते. एकूण व्यक्तींपैकी एकाने जरी संमती दिली नाही तरी खाते फोड होऊ शकत नाही. त्यामुळे पुढील शासकीय प्रक्रिया करण्याआधीच कुटुंबातील सदस्यांची परवानगी घेणे महत्वाचे ठरते.
खाते फोड करण्यासाठी आवश्यक माहिती
जमीनधारक शेतकऱ्यांना खाते फोड करण्याचा एक दहा पानी फॉर्म असतो. त्यामध्ये जमिनीचा संपूर्ण माहिती तपशील देणे अनिवार्य असते. जसे की, जमिनीचे एकूण क्षेत्र, घोषणा पत्र, तलाठ्याचा आदेशपत्र, कुटुंबातील सर्वांचे प्रतिज्ञापत्र अंतीम आदेश इत्यादी खातेफोड करण्यासाठी करण्यासाठी करणे आवश्यक असते.
Post navigation