Revenue Department : जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमधील गावामध्ये शेतरस्ते, शिवार रस्ते, पाणंद रस्ते कालबद्ध रीतीने खुले करण्यासाठी जिल्हा महसूल प्रशासनाने २० जानेवारी ते ३१ मार्च २०२५ पर्यंतचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे.
या कालबद्ध कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यात २० ते २४ जानेवारीपर्यंत संबंधित गावच्या तलाठी यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडून ग्रामीण गाडी मार्ग (पोटखराब), पायमार्ग नमूद असलेले गाव नकाशे प्राप्त करून घेणे. दुसऱ्या टप्प्यात २५ ते ३१ जानेवारीपर्यंत या नकाशातील ग्रामीण गाडी मार्ग (पोटखराब), पायमार्ग हे प्रत्यक्ष भेट देऊन त्यातील बंद असलेल्या रस्त्याची यादी तयार करणे.
या कालबद्ध कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात १ ते ३१ मार्चपर्यंत पाचव्या टप्प्यानुसार रस्ता खुला न झालेल्या प्रकरणांमध्ये मामलेदार न्यायालय अधिनियम १९०६ चे कलम ५ व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४३ नुसार अर्ज प्राप्त करून घेऊन उचित नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.