अशातच आता बॅंकेच्या पठाणी वसुलीचा प्रकार समोर आला आहे. महागाव तालुक्यातील पेढी गावचे हरी सेवा पवार यांच्याकडे संयुक्त कुटुंबाची २७ एकर जमीन. त्यातील २.९२ हेक्टर क्षेत्राच्या माध्यमातून त्यांनी २०१२ साली जिल्हा बॅंकेकडू तीन लाख ५६ हजार ६९१ रुपये रुपये कर्ज घेतले होते. या कर्जाचा भरणा त्यांना शक्य झाला नाही.
जमीन किंवा घरावर अतिक्रमण झालंय अशी करा कारवाई मिळवा परत जाणून घ्या
परिणामी मुद्दलासह व्याज मिळून ही रक्कम आता ६ लाख ७० हजार ०५७ रुपयांवर पोहचली आहे. कर्ज रक्कम अधिक असल्याने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना या दोन्ही योजनांचा लाभ त्यांना मिळू शकला नाही.
परिणामी या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी आता बॅंकेकडून त्यांच्या २.९२ हेक्टर क्षेत्राचा सांकेतिक ताबा घेण्यात आला आहे. त्यासंबंधीची प्रक्रिया नुकतीच बॅंकेकडून पूर्णत्वास गेल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
सदर मालमत्तेसंदर्भात कोणीही व्यवहार करू नये, केल्यास स्थावर मालमत्ताधारकावर कारवाई केली जाईल, असा इशारा यवतमाळ जिल्हा बॅंक प्रशासनाकडून जाहिरात प्रकाशित करून देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे.
Viral Video गरुडाने केली सिंहाची शिकार 1हजार फूट उंचीवर गेल्यावर कोण पडलं भारी व्हिडिओ पाहा