मुंबई – वनजमीन अतिक्रमणाबाबतच्या कारवाईस स्थगिती देण्याचा निर्णय राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज घेतला आहे. याशिवाय शेतकरी, आदिवासींच्या मागण्यांसंदर्भात नेमण्यात आलेल्या उपसमितीसमवेत पुढील आठवड्यात चर्चा करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

आज अखिल भारतीय किसान सभेने राज्य सरकारसमोर आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात चर्चा केली. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे अखिल भारतीय किसान सभा यांच्या विविध मागण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.

👉आता 1880 सालपासूनचे जमिनीचे रेकॉर्ड पहा ऑनलाईन

या बैठकीत परंपरागत पद्धतीने आदिवासी कसत असलेल्या जमिनी, वनहक्क दावे, वनाधिकार, देवस्थान जमीन, वरकस इत्यादी जमिनी, घरांच्या तळ जमिनी, हिरडा, शेतकऱ्यांना देण्यात येणारी कर्जमाफी, दुग्ध पदार्थ आयात आणि दूध प्रश्न, जमीन अधिग्रहण आणि पुनर्वसन, शेतमालाचे भाव, कांद्याचा प्रश्न, वनांमधील अतिक्रमणे, गायरान जमिनी, शेतकऱ्यांना बारा तास वीज, शेती विषयक कर्ज आदी विविध मुद्यांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली.

या बैठकीतदेखील अखिल भारतीय किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्या मांडल्या. नैसर्गिक आपत्ती आणि शेतकरी, कामगार, शेतमजूर, कर्मचारी श्रमिकांचे मुलभूत प्रश्न यावेळी मांडले. हे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचं सांगण्यात आलेलं असून याबाबत पुढील आठवड्यात विस्तृत बैठक घेण्यात येईल, असे महसूल मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव, वन विभागाचे प्रधान सचिव, नाशिक विभागाचे आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह अखिल भारतीय किसान सभेचे पदाधिकारी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

👉1985 सालपासूनचे जमिनीचे खरेदीखत येथे पहा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!