Crop Damage Compensation : गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशेष बाब म्हणून १ हजार ५०० कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता.
या अनुदानापैकी पहिल्या टप्प्यात ३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर २१० कोटी ३० लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला. सोमवारी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते संगणकीय प्रणालीवर शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वितरीत करण्यात आला.
Crop Damage Compensation
नुकसान भरपाई यादीत नाव पहा
गेल्या वर्षी खरीप हंगामात सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने विशेष बाब म्हणून १ हजार ५०० कोटी रुपये इतका निधी मंजूर केला होता. त्या अनुदानापैकी पहिल्या टप्प्यात ३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर २१० कोटी ३० लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला. Ativrushti Nuksan Bharpai
या निधीचे मदत व पुनर्वसन विभागाच्या डीबीटी प्रणालीमार्फत वितरण सुरु आहे. सोमवारी मंत्रालयामध्ये मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी या निधी वितरणाबाबत आढावा घेतला. त्यावेळी ई – केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी थेट जमा करण्याची प्रक्रिया सुरु केली. crop insurance
हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल. तसेच पुढील शुक्रवारपर्यंत आणखी २ लाख ५० हजार शेतकऱ्यांना १७८ कोटी २५ लाख इतका निधी त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली.