महाभुलेख 7/12 उतारा व 8 अ मालमत्ता पत्रक ऑनलाईन पहा

1) गाव नमुना नंबर 7/12 उतारा कसा बघावा?

2) 8अ उतारा जमाबंदी पत्रक ऑनलाइन बघा

3) मालमत्ता पत्रक (Property Card) ऑनलाईन कसे पहावे?

4) महाभुलेख सातबारा उतारा साठी शासकीय वेबसाईट लिंक

महाभूलेख महाराष्ट्र राज्य भूमि अभिलेख विना स्वाक्षरीत ७/१२, ८अ व मालमत्ता पत्रक (Online property card) पहा. थोडक्यात bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर आपल्या जमिनीचा ऑनलाईन सातबारा बघणे.

अधिकृत वेबसाइट लिंक: bhulekh.mahabhumi.gov.in

MAHA Bhulekh: महाराष्ट्र भूमी अभिलेख 2023

MAHA Bhulekh (i.e. Maharashtra Bhumi Abhilekh) महाराष्ट्र राज्याची अशी वेबसाईट आहे जी महाराष्ट्रातील नागरिकांना 7/12 उतारा, 8A उतारा आणि मालमत्ता पत्रक property card ऑनलाइन प्रदान करते. या वेबसाईटवर दर्शविलेली सातबारा, ८अ व मालमत्ता पत्रक संबंधित माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येत नाही, पाहता आणि जतन देखील करता येते. आपल्याला आपल्या जमिनी बद्दल फक्त माहिती करून घ्यायची असेल, तर त्यासाठी तलाठी कार्यालय सज्जा येथे जाण्याची काहीच गरज नाही. आपल्या जमिनी संबंधित माहिती जसे गाव नमुना नंबर 8अ सातबारा उतारा मलमत्ता पत्रक महाभुलेख वेबसाईटवर सहज मिळते.

गाव नमुना नंबर 7/12 उतारा कसा बघावा?

ऑनलाईन विना स्वाक्षरीत सातबारा उतारा पाहण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शासन महसूल विभागाची अधिकृत महाभुलेख वेबसाईट bhulekh.mahabhumi.gov.in ओपन करा.

अधिकृत सातबारा ८अ उतारा मालमत्ता पत्रक काढा ऑनलाईन

 👉👉येथे क्लिक करा

विभाग निवडा (अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे)

विभाग निवडल्यानंतर जिल्हा, तालुका, गाव निवडा.

सातबारा उताऱ्याचा शोध घेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सर्वे नंबर/ गट नंबर, अक्षरी सर्वे नंबर/ गट नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनाव असे पर्याय दिसतात. जर का आपल्याला गावातील एकूण नावे म्हणजे संपूर्ण गावाची यादी पाहायची असेल तर संपूर्ण नाव हा पर्याय निवडा.

सर्वात सोपा पर्याय सर्वे नंबर/गट नंबर निवडा.

गट नंबर टाका केल्यानंतर शोधा या बटणावर क्लिक करा.

आपला योग्य गट नंबर निवडा कारण काही गटांमध्ये अ,ब,क किंवा एक, दोन, तीन असे पर्याय असतात.

सातबारा उतारा ऑनलाइन नोंदणीसाठी आपला दहा अंकी मोबाईल नंबर टाईप करा.

कॅपच्या कोड बरोबर टाईप करा व Verify captcha to view 7/12 वर क्लिक करा.

गाव नमुना सात (अधिकार अभिलेख पत्रक) व गाव नमुना 12 (पिकांची नोंदवही) म्हणजेच सातबारा (7/12) आपल्यासमोर आहे.

या वेबसाईटवर दर्शविलेली ऑनलाइन माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही माञ पाहता आणि जतन करून ठेवता येईल.

कायदेशीर अथवा शासकीय बाबींसाठी वापरण्यासाठी सातबारा उतारा महाभुमी वेबसाईट mahabhumi.gov.in<span;> वर मिळेल.

Read Also: जमिनीचा सातबारा बंद होणार? नेमका शासन निर्णय काय?

डिजिटल स्वाक्षरीत 7/12, 8A, फेरफार और प्रॉपर्टी कार्ड मालमत्ता पत्रक कैसे देखें?

8अ उतारा जमाबंदी पत्रक ऑनलाइन बघा 

ऑनलाइन 8 अ उतारा पाहण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शासन महसूल विभागाची अधिकृत वेबसाईट bhulekh.mahabhumi.gov.in ओपन करा.

अधिकृत सातबारा ८अ उतारा मालमत्ता पत्रक पाहण्यासाठी

 👉👉येथे क्लिक करा

विभाग निवडा  (अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे)

विभाग निवडल्यानंतर जिल्हा, तालुका, गाव निवडा.

खाता नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनाव, संपूर्ण नाव यापैकी कोणत्याही एका ची निवड करा.

आठ अ नोंदणीसाठी आपला दहा अंकी मोबाईल नंबर लिहा व 8अ पहा या टॅबवर क्लिक करा.

कॅपच्या कोड बरोबर टाईप करा व Verify captcha to view 8A वर क्लिक करा.

गाव नमुना आठ-अ धारण जमिनींची नोंदवही (कृषिक) आसामीवार–खतावणी जमाबंदी पत्रक आपल्यासमोर आहे.

या वेबसाईटवर दर्शविलेली माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही.

कायदेशीर अथवा शासकीय बाबींसाठी वापरण्यासाठी  8 अ उतारा महाभुमी वेबसाईटवर मिळेल.

मालमत्ता पत्रक (Property Card) ऑनलाईन पाहणे

मालमत्ता पत्रक ऑनलाइन पाहण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शासन महसूल विभागाची अधिकृत वेबसाईट bhulekh.mahabhumi.gov.in ओपन करा.

अधिकृत महाभुलेख सातबारा ८अ उतारा मालमत्ता पत्रक पाहण्यासाठी

 👉👉येथे क्लिक करा

Online property card साठी विभाग निवडा (अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे)

विभाग निवडल्यानंतर जिल्हा, तालुका, गाव निवडा.

CTS No. /न. भु.क्र, पहिले नाव, मधील नाव, आडनाव व नाव शोधा यापैकी कोणत्याही एका ची निवड करा.

मालमत्ता पत्रक ऑनलाइन पाण्यासाठी आपला मोबाईल नंबर व कॅपच्या टाईप करा.

महाराष्ट्र जमीन महसूल( गाव, नगर व शहर भूमापन) नियम, 1969 यातील नियम 7 नमुना “ड” म्हणजेच मालमत्ता पत्रक आपल्यासमोर आहे.

महाभुलेख सातबारा उतारा साठी शासकीय वेबसाईट लिंक 

महाराष्ट्रातील महसूल विभाग व त्या अंतर्गत येणारे जिल्हे-

महसूल विभागविभाग अंतर्गत येणारे जिल्हे
1अमरावती विभाग:अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम
2औरंगाबाद विभाग:उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली
3कोंकण विभाग:ठाणे, पालघर, मंबई उपनगर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग
4नागपुर विभाग:गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, वर्धा
5नाशिक विभाग:अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक
6पुणे विभाग:कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर

अधिकृत सातबारा ८अ उतारा मालमत्ता पत्रक पाहण्यासाठी

👉👉येथे क्लिक करा

 

👉जमिनीची वाटणी करा आता 100रुपयांत नवीन शासन निर्णयानुसार असा करा अर्ज👈

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!