CAG Bharti 2023: भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागाने (CAG) काही रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत प्रशासकीय सहायक पदांच्या एकूण १७७३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
उमेदवारांना या भरतीसाठी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.
पदाचे नाव – प्रशासकीय सहायक
एकूण पद संख्या – १७७३
शैक्षणिक पात्रता -मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी/ बारावी किंवा समतुल्य.
अर्जाची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
श्री नीलेश पाटील, सहाय्यक. C&AG (N)-I, O/o the C&AG ऑफ इंडिया, 9, दीनदयाल उपाध्याय मार्ग, नवी दिल्ली- 110124.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात पहा
मुंबईत नोकरीची मोठी संधी! शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये ‘या’ पदासाठी भरती सुरु, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
अधिकृत वेबसाईट – cag.gov.in
असा करा अर्ज –
- भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरातीत दिलेली असून त्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
- अधिक माहितीसाठी खलील जाहिरात अवश्य पाहा.