Cotton price today : कापसाच्या वायद्यांवर घालण्यात आलेली बंदी हटविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ‘सेबी’ (सेक्युरिटीज् अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) अंतर्गत कार्यरत ‘पीएसी’ (प्रॉडक्ट अॅडव्हायझरी कमिटी)च्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे कापसाचे वायदे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वायदे सुरू होण्यास किमान १० दिवस लागतील, अशी माहिती ‘एमसीएक्स’च्या सूत्रांनी दिली. mcx cotton price
शेतकरी संघटनेने मुंबई स्थित ‘सेबी’च्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. दि. २३ रोजी झालेल्या ‘पीएसी’च्या बैठकीत कुठलाही निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे अॅग्रोस्टारचे दिलीप ठाकरे यांनी ‘पीएसी’ची पुन्हा बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेतल्याने पीएसी’ची बैठक झाली.
या बाजारसमितीत कापूस विक्रमी दर, पहा बाजार समिती नुसार आजचे दर
दोन तास चाललेल्या बैठकीत दिलीप ठाकरे आणि कॉटनगुरू मनीष डागा यांनी कापसावरील वायदे बंदी हटविण्याचा प्रस्ताव मांडला.
यांनी दिले होते समर्थन
दक्षिण भारतातील टेक्सटाईल व गारमेंट लॉबीच्या सदस्यांनी विरोध दर्शविताच ‘पीएसी’चे अध्यक्ष पी. राजकुमार, सुरेश कोटक, जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष बी. एस. राजपाल यांनी बंदी हटविण्याच्या समर्थनात भूमिका मांडली. जिनिंग प्रेसिंग आणि सूत गिरणी संघटनांच्या प्रतिनिधींनी या मागणीला समर्थन दिले होते. त्यामुळे बंदी हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. cotton market price today