crop insurance: शेतकऱ्यांच्या खात्यात दोनदा पीकविमा जमा; शेतकऱ्यांचे बॅँक खाते गोठवण्याचा (होल्ड करण्याचा) अधिकार विमा कंपनीला आहे का ?

शेतकऱ्यांच्या खात्यावर चुकून दोन वेळा रक्कम जमा करण्यात आली. ही चूक लक्षात आल्यानतंर कंपनीने तात्काळ बँकांना ही रक्कम गोठवण्याच्या सूचना दिल्या.

मात्र तांत्रिक चुकीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात अतिरिक्त रक्कम जमा झाली. ती अतिरिक्त रक्कम गोठवण्यात आली आहे. मात्र कोणत्याही शेतकऱ्याचे बँक खाते गोठवण्यात आलेले नाही, असे कृषी खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

खरीप हंगामातील पीकविमा भरपाईचा निधी कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर १२ कोटी ३५ लाख १३ हजार ३५८ रुपयांची रक्कम कंपनीने जमा केली.

हेहि वाचा – जमिनीचा नकाशा पहा आता मोबाईल वर

परंतु यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर चुकून दोन वेळा रक्कम जमा करण्यात आली. ही चूक लक्षात आल्यानतंर कंपनीने तात्काळ बँकांना ही रक्कम गोठवण्याच्या सूचना दिल्या. बँक खात्यावर रक्कम दिसतेय, परंतु ती काढता मात्र येत नाही, असा अनुभव अनेक शेतकऱ्यांना आला.

त्यांना विमा कंपनीच्या या तांत्रिक चुकीची सुरूवातीला काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. तसेच बँकेकडून आपले खातेच गोठवल्याचीही तक्रार काही शेतकऱ्यांनी केली.

यांसदर्भात बीडचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर म्हणाले, “पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिरिक्त रक्कम जमा करण्यात आली. त्यासंदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी कंपनीने केवळ तांत्रिक चुकीमुळे ही बाब घडल्याचे सांगितले.

हेहि वाचा- या जिल्ह्यांचे जमिनीचे कोणतेही रेकॉर्ड पहा आता ऑनलाईन

तसेच कोणत्याही शेतकऱ्याचे बँक खाते गोठवण्यात आले नसून केवळ अतिरिक्त रक्कम गोठवण्यात आली आहे. या तांत्रिक चुकीमुळे शेतकऱ्यांना मनस्ताप झाला. मात्र तातडीने चूक दुरुस्त करण्याचे आदेश विमा कंपनीला देण्यात आले.

अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरून काढून घेण्याबाबतही सूचना कंपनीला देण्यात आल्या आहेत.

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात ‘बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स’ या खासगी कंपनीकडून पीक विमा काढला होता.

त्याचा निधी कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. परंतु विमा कंपनीच्या सावळ्या गोंधळामुळे शेतकऱ्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागला.

हेहि वाचा – यामुळे अडकु शकतो शेतकऱ्यांचा पीएम किसान चा २००० हफ्ता

दरम्यान, या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते पीकविमा कंपनीला परस्पर शेतकऱ्यांचे बॅँक खाते गोठवण्याचा अधिकार नाही. न्यायालयाने आदेश दिला तरच खाते गोठवण्याची कारवाई करता येऊ शकते.

चुकून शेतकऱ्याच्या खात्यावर जादा रक्कम जमा झाली असेल तर ती त्याच्या सहमतीने परत घेणे किंवा ती अतिरिक्त रक्कम गोठवणे हे उपाय करता येऊ शकतात; परंतु न्यायालयाच्या आदेशाशिवाय बँक खाते गोठवणे ही कृती बेकायदा ठरते, असे या तज्ज्ञांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी आपली पीकविमा स्थिती येथे तपासा

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!