गाई म्हशींसाठी मिळणार 80 हजार अनुदान पहा या योजनेचा लाभ कसा घ्यायचा गाय म्हैस अनुदानात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. दुधाळ गाईसाठी आता प्रति 70000 हजार रुपये एक गाय तर म्हैस प्रती अनुदानात 80000 हजार रुपये एका म्हशीसाठी अशी वाढीव तरतूद नवीन शासन निर्णयात करण्यात आली आहे.
या सुधारित किमतीनुसार योजनांची अंमलबजावणी आर्थिक वर्ष एप्रिल २०२३-२४ पासून होणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या दुधाळ जनावरे गट वाटपाच्या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना तसेच, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थीना दुधाळ जनावरांचे गट वाटप केले जाते.
गायीसाठी ७०, म्हशीसाठी ८० हजार दुधाळ जनावरांचे गट वाटपअंतर्गत वाटप करावयाच्या प्रति दुधाळ देशी, संकरित गायीची किंमत आता ४० हजार रुपयांऐवजी ७० हजार रुपये, तर म्हशीची किंमत ४० हजार रुपयांऐवजी ८० हजार रुपये राहणार आहे. या किमतीनुसार लाभार्थीना दुधाळ जनावरांचे गट वाटप करण्यात येणार आहे goat farming
अर्ज कसा व कुठे कराल?
पशुपालक व शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या अधिकृत असलेल्या या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येतो.
सध्या २०२२-२३ या वर्षातील योजनेचे अर्ज प्रक्रियेत आहेत, तर दुधाळ जनावरांचे सुधारित दरांबाबत शासन निर्णय आला असून या वाढीव दरांबाबतची निर्णयाची योजना १ एप्रिल २०२३ पासून सुरु होणार आहे.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा: गाय गोठ्यासाठी मिळणार आता 77000 हजार रुपये येथे करा अर्ज