Agriculture News : राज्य शासनाने मागील खरिपात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान (Crop Damage) झाल्यानंतर ‘एनडीआरएफ’ निकषानुसार Crop Damage Compensation दुप्पट मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा दिला होता.

परंतु शासनाच्या वन व महसूल विभागाने (Revenue Department) २७ मार्च रोजी नव्याने शासन निर्णय, आदेश काढून हा दुप्पट मदतीचा ‘जीआर’ काढून वाढीव मदत रद्द केली आहे. Crop Damage Compensation यापुढे ‘एनडीआरएफ’च्या जुन्या निकषात किंचित वाढ करून पुढील तीन वर्षांसाठी मदतीचे दर निश्‍चित केले आहेत.

केंद्र शासनाच्या नेसर्गिक आपत्ती निकषाच्या धर्तीवर नेसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या आपद्‍ग्रस्त व्यक्तींना २०२२-२३ ते २०२५-२६ या कालावधीमध्ये देण्यात येणारी मदत निश्‍चित केली आहे. यात राज्य शासनाने २७ मार्च रोजी शासन आदेश काढून नेसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतीपिकांसाठी दर निश्‍चित केले आहेत. Crop Damage Compensation

👉 फक्त गट नंबर टाकून पहा आपल्या जमिनीचा नकाशा

‘एनडीआरएफ’च्या जुन्या निकषानुसार जिरायतीसाठी प्रतिहेक्टर ६८००, बागायतीसाठी १३५००, तर बहुवार्षिक फळपिकांसाठी १८००० असा मदत दर होता. यात शासनाने वेळेवेळी वाढ करून शेतकऱ्यांना मदत दिली होती.

मागील वर्षी राज्यात अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हजारो हेक्टर जमिनी खरडून गेल्या होत्या. तसेच अनेकांना यात जीवही गमवाला लागला होता. Crop Damage Compensation

यावेळी सर्वच स्तरातून अशी परिस्थिती उत्पन्न झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या हेतूने या वेळी शेतकऱ्यांना भरघोस मदत देण्याची मागणी सर्वच स्तरांतून होऊ लागल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘एनडीआरएफ’च्या जुन्या दरात दुपटीने वाढ केली होती. आणि यामध्ये दर जिरायतीसाठी प्रतिहेक्टर ६८०० वरून १३६००, बागायतीसाठी १३५०० वरून २७०००, तर बहुवार्षिक फळपिकांसाठी १८००० वरून ३६००० असा दर वाढून मदत जाहीर केली होती.

जमिनीचे,बांधाचे, रस्त्याचे वाद मिटवा एका दिवसात

येथे करा अर्ज

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!