Crop insurance या जिल्ह्यातील ७ लाख ७० हजार शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रमी विमा देण्याचा शासनाचा मोठा निर्णय
शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रमी विमा देण्याचा मोठा निर्णय आज मंत्रीमंडळ मंडळ बैठकीत घेण्यात आला आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
यामध्ये फक्त बीड जिल्ह्यातील ७ लाख ७० हजार शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रमी पिक विमा वितरीत करण्यात येणार आहे.
हेही वाचा: उर्वरीत या तालुक्यांना नुकसानभरपाई जाहीर यादी पहा
बीड जिल्ह्यात सुरुवातीच्या व मध्य खरीप हंगामात पावसाने दीर्घकाळ खंड दिल्याने शेतकऱ्यांचे व विशेष करून सोयाबीन उत्पादकांचे नुकसान झाले. त्याचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनास विमा कंपनीला 25 टक्के अग्रीम पीक विमा देण्याच्या अधिसूचना काढाण्यासाठी कृषीमंत्री श्री.मुंडे यांनी सूचना दिल्या.
दिवाळीपूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम मिळाला नाही तर आपणही दिवाळी साजरी करणार नाही, अशी भूमिका धंनजय मुंडे यांनी याआधीही जाहीर केली होती, अखेर त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये पण आनंदाचे वातावरण आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा