Crop insurance पिक विम्यापोटी 35 लाख शेतकऱ्यांना 1700 कोटी मिळणार वाचा सविस्तर माहिती.
ज्या जिल्ह्यांना पिक विमा अग्रिम रक्कम मिळणार आहे त्यामध्ये बीड जिल्ह्यात सर्वात जास्त लाभार्थी शेतकरी आहेत तर सर्वात कमीज लाभार्थी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.
बीड जिल्ह्यात लाभार्थी शेतकरी संख्या सात लाखावर असून कोल्हापुरात केवळ 288 लाभार्थी आहेत एक रुपयात पिक विमा योजनेमध्ये राज्यातील एक कोटी 71 लाख शेतकऱ्यांच्या सहभाग घेतलेला आहे.
पिक विमा कंपन्या रक्कम देण्यास करत होत्या टाळाटाळ
तुम्हाला माहित असेलच कि प्रशासनाने हि रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याच्या सूचना या आधीच दिल्या होता परंतु पिक विमा कंपन्यांनी या संदर्भात विभागीय व राज्यस्तरावर अपील केले होते त्यामुळे पिक विमा मिळण्यास विलंब होत होता.
पिक विमा संदर्भात जसजशा सुनावण्या होत गेल्या त्यानुसार पिक विमा कंपन्यांनी 1 हजार 700 कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहेत.
कोणत्या जिल्ह्याला मिळणार किती निधी
कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
अ.क्र. | जिल्ह्याचे नाव | लाभार्थी संख्या | मिळणारी रक्कम (कोटीमध्ये) |
---|---|---|---|
1 | बीड | 770574 | 241.21 |
2 | धाराशिव | 498720 | 218.85 |
3 | परभणी | 441970 | 206.11 |
4 | जालना | 370625 | 160.48 |
5 | नाशिक | 350000 | 155.74 |
6 | अहमदनगर | 231831 | 160.28 |
7 | लातूर | 219535 | 244.87 |
8 | सोलापूर | 182534 | 111.41 |
9 | अकोला | 177253 | 97.29 |
10 | सांगली | 98372 | 2.04 |
11 | नागपूर | 63422 | 52.21 |
12 | सातारा | 40406 | 6.74 |
13 | बुलढाणा | 23558 | 18.39 |
14 | जळगाव | 16921 | 4.88 |
15 | अमरावती | 10265 | 8 लाख रुपये |
16 | कोल्हापूर | 228 | 13 लाख रुपये |
यादीत नाव येथे पहा