Crop insurance पिक विम्यापोटी 35 लाख शेतकऱ्यांना 1700 कोटी मिळणार वाचा सविस्तर माहिती.

राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे  विमा कंपन्याने पहिल्या टप्प्यात सुमारे 1700 कोटी रुपये पिक  विमा अग्रिम रक्कम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे.

ज्या जिल्ह्यांना पिक विमा अग्रिम रक्कम मिळणार आहे त्यामध्ये बीड जिल्ह्यात सर्वात जास्त लाभार्थी शेतकरी आहेत तर सर्वात कमीज लाभार्थी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.

बीड जिल्ह्यात लाभार्थी शेतकरी संख्या सात लाखावर असून कोल्हापुरात केवळ 288 लाभार्थी आहेत एक रुपयात पिक विमा योजनेमध्ये राज्यातील एक कोटी 71 लाख शेतकऱ्यांच्या सहभाग घेतलेला आहे.

या विमा रकमा संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट वितरण करण्यास संबंधित विमा कंपनीने सुरुवात केली असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी बहुतांश ठिकाणी दिवाळीपूर्वीच पीक विम्याची अग्रिम रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

पिक विमा कंपन्या रक्कम देण्यास करत होत्या टाळाटाळ

तुम्हाला माहित असेलच कि प्रशासनाने हि रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याच्या सूचना या आधीच दिल्या होता परंतु पिक  विमा कंपन्यांनी या संदर्भात विभागीय व राज्यस्तरावर अपील केले होते त्यामुळे पिक  विमा मिळण्यास विलंब होत होता.

पिक विमा संदर्भात जसजशा सुनावण्या होत गेल्या त्यानुसार पिक विमा कंपन्यांनी 1 हजार 700 कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहेत.

अजूनही जसजशे निकाल येतील त्यानुसार पिक विमा लाभार्थी संख्या व अग्रिम रकमेमध्ये वाढ होणार आहे. सध्या पिक विमा योजना अंतर्गत महाराष्ट्रामध्ये 35 लाख 8 हजार 303 एवढे शेतकरी लाभार्थी असून 1700 कोटी 73 लाख एवढी अग्रिम रक्कम त्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे.

कोणत्या जिल्ह्याला मिळणार किती निधी

कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. जिल्ह्याचे नाव लाभार्थी संख्या मिळणारी रक्कम (कोटीमध्ये)
1 बीड 770574 241.21
2 धाराशिव 498720 218.85
3 परभणी 441970 206.11
4 जालना 370625 160.48
5 नाशिक 350000 155.74
6 अहमदनगर 231831 160.28
7 लातूर 219535 244.87
8 सोलापूर 182534 111.41
9 अकोला 177253 97.29
10 सांगली 98372 2.04
11 नागपूर 63422 52.21
12 सातारा 40406 6.74
13 बुलढाणा 23558 18.39
14 जळगाव 16921 4.88
15 अमरावती 10265 8 लाख रुपये
16 कोल्हापूर 228 13 लाख रुपये

 

यादीत नाव येथे पहा 

 

Home 🏠

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!