Crop insurance शेतकऱ्यांसाठी दुःखाची बातमी दसरा-दिवाळी गोड नाहीच! पिक विमा कंपन्यांचा आगाऊ 25% पीक विमा देण्यास नकार

Crop Insurance : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी 25 टक्के आगाऊ रक्कम देण्यास विमा कंपन्यांनी नकार दिल्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हाती निराशा येऊन दसरा-दिवाळीवर विरजण पडण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसात 21 दिवसांपेक्षा अधिक जास्त खंड पडल्याने पिकाचे नुकसान झाले आहे. यातच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी आगाऊ पीक विम्याचे (Crop Insurance) दावे फेटाळले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.

विमा कंपन्यांचा सरकारच्या निर्देशांचे पालन करण्यास नकार
यामध्ये विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या दाव्यातून वेळ काढू पणा आणि थेट पळ काढण्यासाठी अनेक कारणे पुढे केले आहेत. काही कंपन्यांनी दावा अर्ज योग्यरित्या भरलेला नसल्याचे म्हटले आहे, तर काही कंपन्यांनी पिकाचे नुकसान नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नसल्याचे म्हटले आहे. राज्य सरकारने यासंदर्भात विमा कंपन्यांना निर्देश दिले आहेत. परंतु विमा कंपन्यांनी सरकारच्या निर्देशांचे पालन करण्यास नकार दिला आहे..

 

Crop Insurance: राज्यातील 43 तालुके आगाऊ पिक विम्यासाठी पात्र यादी पाहा

 

शेतकऱ्यांच्या दसरा-दिवाळीवर निराशा
यामुळे शेतकऱ्यांच्या दसरा-दिवाळीवर निराशाच हाती पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना दसरा-दिवाळीच्या सणांसाठी पैसे लागतात. परंतु विमा कंपन्यांनी आगाऊ 25% पीकविमा रक्कम नाकारल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी यासंदर्भात राज्य सरकारकडे तक्रारी केल्या आहेत. सरकारने यावर त्वरित कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच
पीक विमा कंपन्यांच्या या निर्णयाने ऐन सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांवर निषेध व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना फसवले आहे. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारला आहे. शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

पीक विमा यादीत नाव पहा

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!