eShram Yojna : ई-श्रम योजना काय आहेत फायदे? कसा कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर माहिती

सरकारने नागरिकांच्या हितासाठी अनेक योजना लाँच केल्या आहेत. त्यातील एक योजना म्हणजे ई-श्रम योजना. ई-श्रम योजना ही असंघटित क्षेत्रातील कामगार आणि मजुरांना एकत्रित आणण्यासाठी काम करते. eShram Yojna Registration

ई-श्रम योजना २०२२ मध्ये सुरू करण्यात आली.

गरीब घरातील कामगारांना, मजुरांना त्यांच्या कौशल्याच्या आधारे रोजगार निर्मिती करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत फेरीवाले, भाजी विक्रेते, घरगुती कामगार, लहान नोकरी करणारे तरुण यांना ई-श्रम योजनेचा लाभ घेता येणार आहे. जे लोक कर भरत असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

ई-श्रम कार्डचे फायदे

ई-श्रम कार्ड हे कामगार,मजुरांसाठी तयार केले जाते. केंद्र सरकारने जर कोणती योजना सुरू केली तर या कार्डच्या आधारे त्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल. याचसोबत यामध्ये नोंदणी करणाऱ्यांना दोन लाख रुपयांचा अपघात विमा दिला जाईल.

या योजनेत १६ ते ५९ वय असणारे लोक नोंदणी करु शकतो. नोंदणी झाल्यावर तुम्हाला १२ अंकी युनिक नंबर दिला जाईल. त्याच्या साहाय्याने तुम्ही सरकारच्या अनेक योजनांमध्ये सहभागी होऊ शकता.

ई-श्रम नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा

ई-श्रम कार्ड साठी असा करा अर्ज

  • ई-श्रम कार्ड तयार करण्यासाठी eshram.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • त्यानंतर Register या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर आधार कार्डशी लिंक केलेला फोन नंबर टाका. त्यानंतर ओटीपी टाका.
  • फॉर्ममध्ये दिलेली माहिती भरा.
  • सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा. त्यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होईल.

ई-श्रम नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा

ई श्रम नोंदणीसाठी तुम्हाला या कागदपत्रांची आवश्यकता असते. अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, मोबाईल, बँक पासबुक हे कागदपत्रे लागतील.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!