Farm Road : महसूल यंत्रणेच्या पुढाकाराने शेतरस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार शेतरस्ते घेणार मोकळा श्‍वास

Revenue Department : जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमधील गावामध्ये शेतरस्ते, शिवार रस्ते, पाणंद रस्ते कालबद्ध रीतीने खुले करण्यासाठी जिल्हा महसूल प्रशासनाने २० जानेवारी ते ३१ मार्च २०२५ पर्यंतचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे.

 

शेतकऱ्यांना शेतरस्त्यांचा प्रश्न अनेक ठिकाणी भेडसावत असतो त्यातच महसूल विभागाने यासाठी मोहीम हाती घेतली असून सध्या बुलढाणा जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमधील गावामध्ये शेतरस्ते, शिवार रस्ते, पाणंद रस्ते कालबद्ध रीतीने खुले करण्यासाठी जिल्हा महसूल प्रशासनाने २० जानेवारी ते ३१ मार्च २०२५ पर्यंतचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याअनुषंगाने कार्यपद्धती निश्‍चित करण्यात आली असून, या कालबद्ध कार्यक्रमाचे आदेश जिल्हाधिकारी यांनी नुकतेच जारी केले आहे.

 

या कालबद्ध कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यात २० ते २४ जानेवारीपर्यंत संबंधित गावच्या तलाठी यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडून ग्रामीण गाडी मार्ग (पोटखराब), पायमार्ग नमूद असलेले गाव नकाशे प्राप्त करून घेणे. दुसऱ्या टप्प्यात २५ ते ३१ जानेवारीपर्यंत या नकाशातील ग्रामीण गाडी मार्ग (पोटखराब), पायमार्ग हे प्रत्यक्ष भेट देऊन त्यातील बंद असलेल्या रस्त्याची यादी तयार करणे.

 

Farm Road issue : पाऊलवाट मोकळी होताच साडेआठ फुटी शेतरस्ता

तिसऱ्या टप्प्यात १ ते ७ फेब्रुवारीपर्यंत बंद असलेले रस्ते ज्या भूमापन क्रमांकातून जातात त्यांचे भोगवटाधारकांची यादी तयार करणे. चौथ्या टप्प्यात ८ ते १५ फेब्रुवारीपर्यंत भोगवटाधारक व गावातील सरपंच व इतर सहधारक यांची सदर रस्ता खुला करण्याबाबत बैठक आयोजित करून समन्वयाने व सर्वसहमतीने रस्ता खुला करण्यासाठी प्रयत्न करणे, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सेवक यांच्यासमवेत त्या त्या वादग्रस्त ठिकाणी स्थळ निरीक्षण करून बैठक घेणे, रस्ता खुला करण्यासाठी व दावा निकाली काढण्यासाठी लोकअदालतीच्या निकषानुसार प्रकरणात निर्णय घेणे.

 

जमिनीचे वाद आता कमी होणार जाणुन घ्या नवीन तंत्रज्ञान

 

Farm Road Issue : ग्रामीण मार्ग, शेतरस्त्यांना हवा निधी

पाचव्या टप्प्यात १६ ते २८ फेब्रुवारीपर्यंत चौथ्या टप्प्यातील प्रयत्नातून रस्ता खुला होत नसल्यास उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्या साहाय्याने रस्ता निश्चित करून पोलिसांचे साहाय्याने तो खुला करणे असे राहील. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख व पोलिस निरीक्षक यांनी समन्वयाने कामकाज करून ग्रामीण गाडी मार्ग पायमार्ग कालबद्धरीतीने खुले करावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

 

अंतिम टप्पा महत्त्वाचा

 

या कालबद्ध कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात १ ते ३१ मार्चपर्यंत पाचव्या टप्प्यानुसार रस्ता खुला न झालेल्या प्रकरणांमध्ये मामलेदार न्यायालय अधिनियम १९०६ चे कलम ५ व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४३ नुसार अर्ज प्राप्त करून घेऊन उचित नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

 

वारसा हक्काने जमीन कुणाकुनाला मिळु शकते जाणून घ्या कायदा काय सांगतो?

 

Home

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!