>>>> घरबसल्या नवीन रेशनकार्ड काढता येते. त्यासाठी तुम्हाला सर्वांत अगोदर rcms.mahafood.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल.
>>>> त्यानंतर साईन इन / रजिस्टर या ऑप्शनवर जावं लागेल. या ऑप्शनवर गेल्यानंतर तुम्हाला पब्लिक लॉगीन या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
>>> त्यानंतर न्यू यूजर साईन अप हियर या ऑप्शनवर क्लिक करा.
>>> त्यानंतर आय वान्ट टू अप्लाय न्यू रेशन कार्ड या ऑप्शनला सिलेक्ट करावे.
>>> या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लगेच तुमची माहिती भरण्यासाठी नवा पर्याय खुला होईल. तिथे दिलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी.
>>> अर्जदाराचे नाव, आधार क्रमांक, लॉगीन आयडी, पासवर्ड (क्रियेट करावा लागेल.) लिंग, मोबाईल क्रमांक, ई-मेल अॅड्रेस व्यवस्थित भरून घ्या.
>>> त्यानंतर समोर दिसत असलेला कॅप्चा व्यवस्थित भरावा. त्यानंतर गेट ओटीपी या ऑप्शनवर क्लीक करा.
>>> ओटीपी टाकल्यानंतर सबमीट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.
>>> ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्यक्रमाच्या संकेतस्थळावर तुमचे खाते उघडले जाईल.
>>>एकदा अकाऊंट उघडल्यानंतर पुन्हा एकदा लॉगीनवर जाऊन रजिस्टर्ड युजवरवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर लॉगीन, पासवर्ड टाकून लॉगीन करावे.
>>> त्यानंतर अॅप्लिक्शन रिक्वेस्टमध्ये अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड हा ऑप्शन दिसेल. तिथे तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर नव्या रेशनकार्डसाठीची संपूर्ण
>>> प्रक्रिया पार पाडावी. गरजेची असणारी कागदपत्रे अपलोड करावीत.
>>> तुम्ही नव्या रेशनकार्डसाठी पात्र असाल तर तुम्हाला तुमचे नवे रेशन कार्ड मिळून जाईल.
कागदपत्रे कोणकोणती लागतात?
नवीन राशन कार्ड काढण्यासाठी
येथे क्लिक करा