राज्यातील बेघर नागरिकांना घरकुल अनुदान वाटप सुरु, ‘या’ योजनेअंतर्गत हक्काचे घरकुल, गावनिहाय यादी पहा

Maharashtra Gharkul Yojana : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यामध्ये ज्या नागरिकांना हक्काचे घर नाही अशांसाठी घरकुल योजना रोजगार हमी योजनेअंतर्गत देखील अनेक योजना राबवल्या जात आहेत.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील बेघर नागरिकांसाठी मोदी आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पीएम आवास योजना अशा योजना राबवल्या जात आहेत.
यामध्ये शबरी आवास योजना ही अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे दुसरीकडे अलीकडे सुरू झालेली मोदी आवास योजना ही ओबीसी प्रवर्गातील नागरिकांसाठी सुरू झालेली आहे. तर प्रधानमंत्री आवास योजना ही सर्व सामान्यांसाठी आहे. Gharkul yojana

गावनिहाय यादी येथे पहा

तसेच रमाई आवास योजना ही अनुसूचित जाती प्रवर्गातील अर्थातच एससी प्रवर्गातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत एससी प्रवर्गातील नागरिकांना घरकुलासाठी अनुदान दिले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या योजनेची सुरुवात 2016 मध्ये झाली आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत राज्यातील जवळपास दीड लाख नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध झाले आहे.

एकट्या अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला असता जिल्ह्यात आत्तापर्यंत 26,155 बेघरांना या योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ मिळाला असून या बेघर गरजवंत नागरिकांच्या डोक्यावर हक्काचे छप्पर आले आहे. दरम्यान आज आपण रमाई आवास योजनेबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

रमाई आवास योजनेचे स्वरूप

रमाई आवास योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेची सुरुवात 2016 मध्ये झाली होती.

या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील अर्थातच एस सी कॅटेगिरी मधील नागरिकांना घर बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. Gharkul yojana

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दीड लाखांपर्यंतचे अनुदान मिळते. यामध्ये एक लाख वीस हजार रुपये घर बांधण्यासाठी, 12,000 रुपये शौचालय बांधण्यासाठी आणि रोजगार हमी योजनेतून 21,420 रुपये असे एकूण दिड लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळते.

अशाच नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करा

लाभ कोणाला मिळतो

या योजनेचा लाभ फक्त आणि फक्त अनुसूचित जाती प्रवर्गातील आणि नवबौद्ध प्रवर्गातील नागरिकांना दिला जातो. या योजनेचा लाभ पक्के घर नसलेल्या आणि बेघर नागरिकांना मिळतो.

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न एक लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक असते. या योजनेच्या लाभासाठी लाभार्थी कमीत कमी 15 वर्षांपासून महाराष्ट्रातील रहिवासी असला पाहिजे.

एकूण दिड लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळते.

लाभ कोणाला मिळतो?

या योजनेचा लाभ फक्त आणि फक्त अनुसूचित जाती प्रवर्गातील आणि नवबौद्ध प्रवर्गातील नागरिकांना दिला जातो. या योजनेचा लाभ पक्के घर नसलेल्या आणि बेघर नागरिकांना मिळतो.

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न एक लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक असते. या योजनेच्या लाभासाठी लाभार्थी कमीत कमी 15 वर्षांपासून महाराष्ट्रातील रहिवासी असला पाहिजे.

गावनिहाय यादी येथे पहा

 

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!