Gold-Silver Price Today: निवडणूकी निकालाच्या आधीच ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सोमवारी बाजार उघडताच सोन्याच्या दरात घसरण नोंदवली गेली असून उच्चांकी किमतीवरून सोने आणि चांदी किंचित स्वस्त झाले आहे.

त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंतच्या उच्चांकावरून स्वस्त किमतीत सोने खरेदीची ग्राहकांना आज संधी मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव.. आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

 

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७१,४४० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७१,८८० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ९१,२८० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ९१,९२० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

 

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६५,३६८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,३१० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,३६८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,३१० रुपये आहे.
नागपूर २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,३१० रुपये इतका आहे.
नाशिक २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,३१० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

 

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

 

सोन्या चांदीचे लाईव्ह दर येथे पाहा

 

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

 

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!