Pandharpur Breaking News : महाराष्ट्र आणि कर्नाटकसह देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरच्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात सुशोभीकरणाचे काम सुरू असताना तळघर सापडलं आहे. सात- ते आठ फुटाचे हे तळघर असून पुरातत्व विभागाच्या उपस्थितीत तळघर उघडण्यात आलं आहे.

यामध्ये अनेक पुरातन वस्तू यामध्ये आढळल्या आहेत. त्यामध्ये देव देवतांच्या मूर्तींचाही समावेश आहे. तीन दगडाच्या मूर्ती आणि पादुका , काही जुनी नाणी आणि बांगड्याचे अशवेश असल्याची माहिती पुरातत्व विभागाचे संचलक विलास वाहने यांनी ही माहिती दिली.

 

 

मंदिरात काय काय सापडलं?

विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये तळघर सापडले होते. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी तळघरांमध्ये उतरून पाहणी केली. या पाहणीमध्ये तळघरात चार ते साडेचार फुटाच्या दोन विष्णू अवतारातील व्यंकटेश्वराच्या मूर्ती आणि एक महिशासूर मर्दिनीची मूर्ती सापडली आहे. एकूण सहा मूर्ती सापडल्या आहेत. सात फूट खोल असलेल्या या तळघरात 6 फूटाची एक खोली आहे. यामध्ये या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या, अशी माहिती विलास वाहने यांनी दिली.

विठ्ठल मूर्तीशी या मूर्तींडा संबंध नाही

विठ्ठल मंदिरात आज दुपारी एक तळ घर सापडले आहे. आठ फूट खोलीच्या तळ घरात एकूण सहा मूर्ती सापडल्या आहेत. यामध्ये विष्णूच्या दोन, एक व्यंकटेश, एक महिशासूर मर्दनी, आणि एक पादुका आदी दुर्मिळ दगडी मूर्ती सापडल्या आहेत. या सर्व भंग पावलेल्या मूर्त्या आहेत. यामध्ये विठ्ठलाची एक ही मूर्ती सापडली नाही. त्यामुळे विठ्ठलाच्या मूर्तीशी याचा संबंध नाही, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. पंधराव्या शतकातील या सर्व मूर्ती असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

अधिक माहिती येथे पाहा

 

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!