Gold-Silver Price: ग्राहक आनंदी! सोन्याचा भाव कोसळला, पाहून बाजारात गर्दी

Gold-Silver Price Today: दिवसेंदिवस सोन्याच्या दरात वाढ होत असल्यानं ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागत होती पण आज थोडा दिलासा मिळाला आहे.

Gold-Silver Price Today: सोन्याच्या दरात किचिंत घसरण झाल्यामुळे ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आज गुरुवारी, बाजार उघडताच सोन्याच्या दरात घसरण नोंदवली गेली असून उच्चांकी किमतीवरून सोने आणि चांदी किंचित स्वस्त झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंतच्या उच्चांकावरून स्वस्त किमतीत सोने खरेदीची ग्राहकांना आज संधी मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

 

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७२,३९० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७२,६४० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ९५,२१० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ९६,१७० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. Gold Price Today

 

आजचे सोन्याचे चांदीचे लाईव्ह दर येथे पाहा

 

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर

मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६६,२३८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ७२,२६० प्रति १० ग्रॅम आहे.

पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,२३८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,२६० रुपये आहे.

नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,२३८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,२६० रुपये इतका आहे.

नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,२३८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,२६० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

 

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत. Gold Price Today

 

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

 

आजचे सोन्याचे चांदीचे लाईव्ह दर येथे पाहा

 

 

Home 🏠 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!