Gram Panchayat Election : ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सोमवारपासून (ता. २८) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आरंभ होत आहे.

या निवडणुकीत रत्नागिरी आणि दापोली मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून किती उमेदवार उभे करण्यात येणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी, तर शिंदेंच्या पक्षाशी भाजपची युती झाली नसल्याने पुढील चार दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत. voter registration

निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय वर्तुळ ढवळून निघाले होते. निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रयत्न सुरू होते. grampanchayat election काही ठिकाणी बिनविरोध जागाही करण्याचा स्थानिक पातळीवर निर्णय झाला आहे; मात्र बाळसाहेबांची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या दोन पक्षांकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविण्यात आली आहे. निवडणूक विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मंडणगड १४, दापोली ३०, खेड १०, चिपळूण ३१, गुहागर २०, संगमेश्वर ३५, रत्नागिरी २८, लांजा १८ आणि राजापूरमधील ३० ग्रामपंचायतींत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवारपासून आरंभ होणार आहे.

👉मतदान नोंदणी,दुरुस्ती करा आता मोबाईलवर पहा

जिल्ह्यात सर्वाधिक लक्ष मंडणगड-खेड-दापोली आणि रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघावर राहणार आहे. या दोन्ही ठिकाणी आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आहेत. रत्नागिरीतील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिंदे गटाला ठाकरे गटाने शह दिला होता. त्यामुळे या निवडणुकांकडे सर्वांचे विशेष लक्ष असेल. ग्रामीण भागातील मतदार कुणाच्या पारड्यात मते टाकतो, हे पाहायला मिळणार आहे. दोन्ही विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतींचा आकडा अधिक असल्याने ही निवडणूक आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीची सत्त्वपरीक्षा ठरणार आहे. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे मंत्रिमंडळात उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे स्वतःच्या मतदारसंघाबरोबरच आजूबाजूच्या मतदारसंघातही ग्रामपंचायतींवर प्रभुत्व मिळवण्यासाठी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे.

असा आहे कार्यक्रम

ग्रामपंचायतींसाठी २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज मागवले जातील. अर्जांची छाननी ५ डिसेंबरला होईल. ७ डिसेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंतची मुदत आहे. त्यानंतर निवडणूक लढवणाऱ्‍या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप केले जाणार आहे. १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते ५.३० यावेळेत मतदान होणार आहे; तर मतमोजणी २० डिसेंबर रोजी होणार आहे.

👉 सुकन्या समृद्धी योजनेत मोठे बदल आता दोन ऐवजी तीन मुलींना मिळणार लाभ

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!