Hingoli news : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आज भूकंपाचे धक्के बसले. सकाळी सात वाजून २० मिनिटांच्या सुमारास भूकंप झाला. सौम्य धक्के आणि जमिनीत गूढ आवाजामुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.

दोन ते तीन वेळा भूकंपाचे हे धक्के बसले. काही सेकंदासाठी जमीन हादरल्यानं नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. याचे व्हिडीओसुद्धा आता व्हायरल होत आहेत.

हिंगोलीतल्या माळधामणी गावामध्ये आज सकाळी भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर नागरिक भयभीत झाले. गावात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. गावातले लोक नेहमीप्रमाणे त्यांच्या कामात असतानाच अचानक आवाज झाला आणि जमीन हादरली. तीन ते चार सेकंदासाठी झालेला हा प्रकार सुरुवातीला कोणाच्याच लक्षात आला नाही. पण जमीन हादरल्याने लोकांमध्ये गोंधळ उडाला. काही वेळाने लोकांना हा भूकंप असल्याची जाणीव झाली.

 

पाहा वायरल व्हिडीओ –

 

 

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागात जाणवले भूकंपाचे सौम्य झटके बसले. तर परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यातील काही भागात सकाळी सात वाजेच्या सुमारास धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यानंतर नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं. हिंगोली जिल्यात ४.५ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली.

 

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!