ITI Admission : औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना सोमवारपासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात २० हजार ८२८ जागा उपलब्ध आहेत.

शासकीय ‘आयटीआय’मध्ये ८० हून अधिक ट्रेडसाठी १४ हजार ९२ जागा, तर खासगीमध्ये ६ हजार ७३६ इतक्या प्रवेशासाठी जागा उपलब्ध आहेत.

आयटीआयमधून विविध कंपन्यांना आवश्यक प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ पुरवले जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कौशल्याच्या बळावर स्वत-च्या पायावर उभे राहण्यास आयटीआय प्रशिक्षणाचा फायदा होता.

आयटीआय संस्थेत कॉम्प्युटर ऑपरेटर, फिटर, टर्नर, इलेक्ट्रिशन, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, पेंटर जनरल, शीट मेटल वर्क हे ट्रेड उपलब्ध असून, विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन, एसटी पासची सुविधा दिली जाते. ‘आयटीआय’मध्ये मुलींसाठी ३० टक्के जागा राखीव आहेत.

दहावी आणि बारावी समकक्षता असल्याने, आयटीआयसोबतच विद्यार्थ्यांना दहावी व बारावीचे प्रमाणपत्र देखील मिळते. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना आयटीआय झाल्यानंतर एकाच वेळी ‘आयटीआय’ कोर्स पूर्ण केल्याचे आणि बारावीचे प्रमाणपत्रसुद्धा मिळते.

त्यातून विद्यार्थ्यांची दोन शैक्षणिक वर्षांची बचत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज, बजाजनगर, शेंद्रा, पैठण येथील औद्योगिक वसाहतींमधील नामांकित कंपन्यांमध्ये ‘आयटीआय’मधील उमेदवारांची प्रचंड मागणी आहे. त्यामुळे अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध होतात.

दहावी नापासही करू शकतात नोंदणी

दहावी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून विविध कार्यक्रम आखण्यात आले आहेत.

त्यामुळे परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी नाउमेद न होता शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

आयटीआय नोंदणी व अर्ज येथे करा

 

दृष्टिक्षेप..

मराठवाड्यातील संस्था

शासकीय – ८२, जागा – १४,०९२

खासगी – ६७, जागा – ६,७३६

प्रवेशाचे वेळापत्रक

 • ३ ते ३० जून – ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे,
 • ५ जून ते १ जुलै – प्रवेश अर्ज निश्चिती करणे
 • ५ जून ते २ जुलै – पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे
 • ४ जुलै – प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर
 • ४ ते ५ जुलै – गुणवत्तायादी बाबत हरकती नोंदविणे व प्रवेश अर्जातील माहितीत बदल करणे
 • ७ जुलै – अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे
 • १४ जुलै – पहिली प्रवेश फेरी
 • १५ ते १९ जुलै – पहिल्या फेरीतील उमेदवाराचे प्रमाणपत्र पडताळणी, प्रवेश निश्चिती, दुसरी प्रवेश फेरी
 • २७ जुलै – दुसऱ्या फेरीतील निवड यादी जाहीर
 • २८ जुलै ते २ ऑगस्ट – दुसऱ्या फेरीतील कागदपत्र पडताळणी, प्रवेश अंतिम, तिसरी प्रवेश फेरी
 • ९ ऑगस्ट – तिसऱ्या यादीतील निवड यादी प्रसिद्ध
 • १० ते १४ ऑगस्ट – चौथी प्रवेश फेरी
 • १७ जुलै ते २४ ऑगस्ट – नव्याने ऑनलाइन प्रवेश अर्ज करणे, प्रवेश निश्चिती
 • २६ ऑगस्ट – संस्थास्तरीय समुपदेशन फेरी
 • २१ जुलै – खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील संस्था स्तरीय प्रवेश

 

HOme

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!