Soyabean price अंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव काहीसे नरमले होते. शुक्रवारी सोयाबीन वायद्यांमध्ये सव्वा टक्क्यांची नरमाई आली होती. तर सोयापेंडच्या वायद्यांमध्ये तब्बल २,६३ टक्क्यांची घट झाली होती.

सोयाबीनचे वायदे १३.४४ डाॅलरवर बंद झाले होते. तर सोयापेंडच्या वायद्यांनी ४५४ डाॅलरची पातळी गठली होती. देशातील बाजारात मात्र सोयाबीनचे भाव स्थिर होते. सोयाबीनला सरासरी ४ हजार ९०० ते ५ हजार १०० रुपयांचा भाव मिळाला. मागील दोन दिवस बाजारातील सोयाबीनची आवक कमी झाली होती. याचा परिणाम दरावर झाला असून दरपातळी स्थिरावली होती, असे अभ्यासकांनी सांगितले.

देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव स्थिर होते. कापसाच्या वायद्यांमध्ये मागील काही दिवसांमध्ये नरमाई दिसून आली होती. पण आठवड्याच्या शेवटी वायदे काहीसे स्थिरावले होते. देशातील वायदे किंचित कमी होऊन ५७ हजार ३०० रुपये प्रतिखंडीवर होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस वायदे ७८.७९ सेंट प्रतिपाऊंडवर होते. बाजार समित्यांचा विचार करता आजही दरपातळी ६ हजार ९०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान कायम होती. बाजारातील कापूस आवकही काहीशी कमी झालेली दिसते. त्यामुळे कापसाच्या भावात काहीशी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

गव्हाला चांगलाच उठाव मिळत आहे. त्यामुळे मागील आठवडाभरात गव्हाच्या भावात क्विंटलमागं किमान १०० रुपयांची वाढ झाली आहे. देशातील गहू उत्पादन सलग दुसऱ्या वर्षी कमी झालं होतं. तसेच सरकारला चालू वर्षीही खरेदीचं उद्दीष्ट साध्य करता आलं नाही. पण बाजारातील वाढलेल्या किमती कमी करण्यासाठी सरकार बफर स्टाॅकमधील गहू बाजारात विकत आहे. पण एफसीआयच्या विक्रीतही गव्हाला चांगला भाव मिळतोय. त्यामुळे खुल्या बाजारात गव्हाचे भाव आता २ हजार ८०० ते ३ रुपयांच्या दरम्यान पोचला. गव्हाचे उत्पादन यंदाही कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गव्हाचे भाव तेजीतच राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

आजचे कापूस,सोयाबीन बाजारभाव येथे पहा

 

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!