Ladaki bahin yojana विधानसभा निवडणुकी आधी महायुती सरकारने लाडकी बहिण योजना जाहीर केली. ही योजना भलतीच यशस्वी ठरली. राज्यात मोठा प्रतिसाद या योजनेला मिळाला. जसा या योजनेला प्रतिसाद मिळाला तसा लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पदरातही भरभरून मतं टाकली.
Video Viral बंजी जम्पिंग करताना दोरीच तुटली तरुणीचा थरारक व्हिडिओ वायरल
जनतेने आम्हाला जनादेश दिला आहे, तो तुम्ही स्विकारा असं देवेंद्र फडणवीसांनी सुरूवातीलाच सांगितले. गेल्या तीस वर्षात ऐवढा मोठा विजय कोणालाच मिळाला नाही असंही ते म्हणाले. या विजयामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. निवडणुकीत आम्ही जी आश्वासने दिली आहेत. ती आम्ही पूर्ण करणार आहोत. त्यापासून आम्ही मागे हटणार नाही असंही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं. शिवाय ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्या कधीही बंद करणार नाही असं आश्वासन ही त्यांनी यावेळी दिलं.
विशेष म्हणजे लाडकी बहिण योजनेबाबत फडणवीस काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानुसार फडणवीस यांनी लाडकी बहिण योजनेचा उल्लेख केला. लाडक्या बहिण योजनेचा डिसेंबरचा हफ्ता आम्ही हिवाळी अधिवेशन संपल्यावर त्यांच्या खात्यात टाकणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले आहे. नागपूर इथे होत असलेलं अधिवेशन 21 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे 21 डिसेंबरनंतर हा हफ्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.
या महिलांनाच पुढील हफ्ता मिळणार या यादीत नाव पाहा
यादीत नाव पाहा