Viral Video Bungee Jumping आपल्यापैकी अनेकांना विविध साहसी गेम खेळायला आवडतात. साहसी गेममधला एक साहसी गेम म्हणजे बंजी जम्पिंग. सोशल मीडियावर बंजी जम्पिंगचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले आहेत.

बंजी जम्पिंगचा थरार अनुभवण्याची आपल्यापैंकी अनेक व्यक्तींची इच्छा असते. जर तुमच्याही बकेट लिस्टमध्ये बंजी जम्पिंग असेल तर त्याआधी व्हायरल झालेला एक व्हिडिओ पाहा.

 

बंजी जम्पिंगचे व्हिडिओ पाहताना अनेकांच्या मनात एक गोष्ट नक्की येत असेल, ती म्हणजे ही दोरी तुटली तर. पण खरंच ही दोरी तुटली तर काय होत असेल. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात शेकडो फूट उंचीवरुन एक महिला उडी घेते आणि दोरीच तुटते.

 

व्हिडिओ पाहा येथे क्लिक करा

 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, एक महिला बंजी जम्पिंग करण्यासाठी आलेली आहे. बंजी जम्पिंग करण्यासाठी ती सर्व सेफ्टीची शाहनिशा करुन तयार होते.काही वेळानंतर तिथे असलेला माणूस तिला उंचीवरुन धक्का मारतो आणि धक्का मारताच महिला खाली जाते. मात्र यानंतर तिला पुढे काय होईल त्याची कल्पनाही नव्हती. जसे महिलेला बंजी जम्पिंग करण्यासाठी धक्का मारला जातो तेव्हा खाली जाताच महिलेच्या बंजी जम्पिंगची दोरी तूटते अन महिला थेट पाण्यात पडते. या अपघातात महिलेला किती दुखापत झाली असेल नाही माहिती.

 

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा 

 

व्हायरल होत असलेल्या बंजी जम्पिंगचा थरार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील@FAFO_TVया पेजवर पोस्ट करण्यात आला आहे.मात्र व्हिडिओ पाहिल्यानंतर बंजी जम्पिंगचा थरार अनुभवायचा असल्यास सुरक्षा देखील महत्त्वाची असल्याचे अधोरेखित होत आहे.याआधीही आपण अनेक थरारक साहसी स्टंट करताना झालेले अपघातांचे व्हिडिओ पाहिले आहेत.

 

सध्या या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला लाखोंच्या घराच व्ह्यूज मिळाले असून मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहेत. व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी विविध कमेंटस् केल्या आहेत. एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत लिहिले आहे की,’आम्ही नाही करणार असे साहस’तर काही यूजरने लिहिले आहे की,’ बंजी जम्पिंग करणारी तरुणीला दुखापत झालेली नसावी’.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Home 🏠

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!