Government schemes शासन विविध योजना राबवत असते. नागरिकांच्या सुखसुविधेसाठी सरकार विविध अर्थसहाय्य करत असते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो किंवा शेतकरी सन्मान योजना असो यातीलच एक भाग म्हणून. दरम्यान शासनाकडून आता मुख्यमंत्री वयोश्री योजनाही राबवली जात आहे.

या योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन हजारांचे अर्थसहाय करण्यात येते.३१ डिसेंबर २०२३ रोजी वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. समाजकल्याण विभाग या योजनेची माहिती तळागाळापर्यंत जावी यासाठी प्रयत्नशील आहे. या योजनेचा विचार जर केला तर नाशिक विभागातून सदर योजनेसाठी १७४६८ ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज केले आहेत.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू घरच्या घरीच 2मिनिटांत करा ऑनलाईन अर्ज

यामध्ये १५६०० अर्ज जळगाव जिल्ह्यातून प्राप्त झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातून १३०० व अहमदनगर जिल्ह्यातून ६३४ ज्येष्ठांचे अर्ज प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता अहमदनगरमधील नागरिकांना याचा लाभ घेता यावा यासाठी अर्जाची

आणि लाभार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी तसेच योजनेचा लाभ तळागाळात ज्येष्ठांना मिळावा, यासाठी जास्तीत जास्त पात्र ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी केले आहे.

काय आहे ही योजना?
ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता ३ हजार त्यांना मिळणार आहे.

शेतकऱ्यांना खात्यात जमा झाले 2000 तुम्हाला आले का? असे चेक करा मोबाईलवर

पात्र जेष्ठ लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता आणि दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येतील, त्यामध्ये चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी-ब्रेक्स, लंबर बेल्ट,

सर्व्हयकल कॉलर यांचा समावेश असून राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मनःस्वास्थ्य केंद्र, मनःशक्ती केंद्र / प्रशिक्षण केंद्र येथे त्यांना सहभागी होता येणार आहे.

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!