Maharashtra Rain Crisis : पावसाच्या हुलकावणीमुळे काही भागातून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशात, कृषी विभागाने पीक परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

त्यात राज्यातील ७९ तालुक्यांतील २१६ मंडळांमध्ये २१ दिवसांहून अधिक पावसाने खंड दिल्याचे स्पष्ट झाले.

१५ ते २१ दिवसांचा पावसाचा खंड १७७ तालुक्यांतील ५२८ मंडळांमध्ये राहिला आहे. शिवाय, १५ तालुक्यांत २५ ते ५० टक्क्यांपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. (maharashtra rain crisis news)

राज्यात १ जून ते २१ ऑगस्ट या कालावधीतील सरासरी पाऊस ७३२.२ मिलिमीटर असून, प्रत्यक्षात ८९ टक्के म्हणजे, ६५१.१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जूनमध्ये ५३.६०, जुलैमध्ये १३८.७०, तर ऑगस्टमध्ये २१ दिवसांत ४१.७० टक्के पाऊस झाला आहे.

२५ ते ५० टक्के पाऊस झालेले तालुके जिल्हानिहाय असे : नाशिक- सिन्नर, चांदवड, नांदगाव. नंदुरबार- नंदुरबार. अहमदनगर-श्रीरामपूर, राहुरी. पुणे- बारामती, पुरंदर, हवेली. सातारा- कोरेगाव, फलटण. सांगली- कडेगाव, खानापूर, विटा. कोल्हापूर- राधानगरी. अमरावती- दर्यापूर.

१५ जिल्ह्यात ५० ते ७५ टक्के पाऊस

नाशिक, धुळे, नंदुरबार, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, अकोला, अमरावती या १५ जिल्ह्यांत ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, सोलापूर, धाराशिव, हिंगोली, बुलढाणा, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत ७५ ते १०० टक्के पाऊस झाला.

शेतात विजेची लाईन पोल अथवा डीपी असल्यास किती मोबदला मिळतो पहा तरतूद

शंभर टक्क्यांहून अधिक पावसाचे सात जिल्हे राहिले. त्यात ठाणे, रायगड, पालघर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे. दरम्यान, राज्यात एक कोटी ४२ लाख दोन हजार सर्वसाधारण क्षेत्रापैकी एक कोटी ३८ लाख चार हजार म्हणजेच ९७ टक्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील पावसाचा खंड

जिल्ह्याचे नाव १५ ते २१ दिवस खंड २१ दिवसांपेक्षा अधिक खंड

महसूल मंडळ संख्या तालुक्यांची संख्या महसूल मंडळ संख्या

अहमदनगर ४० ११ ४२

नाशिक १६ ५ १५

जळगाव १९ ५ १०

धुळे ६ ० ०

नंदुरबार १ ० ०

राज्य एकूण ५२८ ७९ २१६

अद्याप मागील अतिवृष्टी नुकसान भरपाई आलेली नाही त्यांनी यादी येथे पहा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!