CM Kisan Samman Nidhi : राज्यसरकारने पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. या योजनेचा लाभ हा पीएम किसानच्या १४ व्या हप्त्याबरोबर थेट शेतकऱ्यांना खात्यात देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.

मात्र केंद्र सरकारचा १४ वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे परंतु namo shetkari राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना आलेच नाहीत. याचे कारण काय? त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी मिळणार, याच प्रतीक्षेत शेतकरी आहेत. आणि आज आपण जाणून घेणार आहोत नेमका हफ्ता अडकला कुठं आणि यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत करोडो शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. त्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत.

यादीत नाव पहा

राज्यात लाखोंच्या संख्येने शेतकरी अद्याप केवायसी पूर्ण झालेली नाही, असे शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झालेली आहे की नाही, यासाठी कृषी विभागाच्या वतीने तपासणी सुरू केली आहे. त्यासाठी महसूल विभागाकडून संबंधित शेतकऱ्यांचेच लॉगिन आयडी उपलब्ध करून शोधण्याचे काम सुरू आहे यातच यांकडे कृषिमंत्र्यांनी देखील लक्ष केंद्रित केले आहे. pm kisan beneficiary list

दरम्यान ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात हफ्ता जमा झाला नाही त्या शेतकऱ्यांच्या माहितीत बँक खाते, आधार कार्ड, सातबारा शेतकऱ्यामध्ये त्रुटी समोर आल्या आहेत. त्यातील काहीजण मृत आहेत तर काही इन्कम टॅक्सधारक आहेत. स्थलांतरित असून त्यांचा नवीन रहिवासी पत्ता नाही. यासंदर्भातील माहिती आता शासनाला कळविण्यात येणार आहे. Pm kisan yojana

पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात सुमारे लाखांवर शेतकरी अपात्र ठरले होते. निकष लावल्यानंतर यातील शेतकरी कमी होऊन सध्या सर्व प्रक्रिया पूर्ण असलेले शेतकरी पात्र ठरले आहेत. तरीही यातील अनेक शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये अद्याप जमा झालेले नाहीत, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

दरम्यान, राज्य सरकारने जाहीर केलेल्या वार्षिक 6000 रुपये रकमेपैकी पहिला हप्ता 2000 जमा होईल, अशी अपेक्षा होती; पण शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. परंतू अनेक तांत्रिक बाबींचा विचार केला तर शेतकरी आपली प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना यात पात्र ठरविले जाईल आणि ज्या शेतकऱ्यांची अद्याप पीएम किसान योजनेत नोंदणी नाही अशा शेतकऱ्यांनी नोंदणी करणे अनिवार्य आहे तरच आपल्याला पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळेल तर जाणून घेऊ सध्या कोणते शेतकरी यासाठी पात्र आहेत यादी पहा.

शेतकरी यादीत नाव पहा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!