राज्यातील संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली आहे. या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकार अनुदान देणार आहे. onion market today

अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधकांनी कांद्याच्या प्रश्नावरुन पुन्हा एकदा सरकारला जाब विचारला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार एवढे अनुदान येथे पहा

खरं पाहिलं तर आपल्या देशाच्या कांदा उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. ४३ टक्के वाटा हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, “बाजारात लाल कांद्याची आवक जास्त आहे. देशातल्या इतर राज्यांमध्ये उत्पादन वाढलं आहे. मात्र कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. onion market

आता कांदा उत्पादक शेतकऱ्याला प्रति क्विंटल ३०० रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान देणार आहे. २०० रुपये अनुदानाची शिफारस करण्यात आली होती, मात्र आता आपण ३०० रुपये देण्याचा निर्णय घेतला, असं या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

त्यामुळेच राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी समिती नेमली. यामध्ये निर्णय झाल्याप्रमाणे आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देत आहोत. यासाठी २०० रुपयेची शिफारस होती, मात्र आम्ही ३०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे अनुदान देत आहोत. onion subsidy

या शेतकऱ्यांना मिळणार एवढे अनुदान येथे पहा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!