Pahalgam Attack Video Viral : जम्मू काश्मीरच्या पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. या पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील २ नागरिकांचा समावेश आहे.

 

दहशतवाद्याच्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात एकच संताप व्यक्त केला जात आहे. पर्यटकांवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे.

Pahalgam Terror Attack : ती ठरली आयुष्यातील शेवटची सहल; दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील कुटुंबाचा आधारवड हरपला

जम्मू-काश्मीरमधील बैसरनमधील खोऱ्यात दहशतवादी हल्ला झालाय. दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार अॅक्शन मोडवर आलं आहे. हल्ल्यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. पर्यटकांवर अचानक करण्यात आलेल्या हल्ल्यात २७ पर्यटक दगावले आहेत. या हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या हल्ल्याचा पहिला व्हिडिओ समोर आलाय.

पहिल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका व्यक्ती बैसरन खोऱ्यातील गवतात चालताना दिसत आहे. काही सेकंद चालल्यानंतर गोळीबाराची घटना घडते. या गोळीबारानंतर व्यक्ती घाबरून जातो. आजूबाजूला पाहायला सुरुवात करतो. या व्हिडिओमध्ये गोळीबार आणि लोकांच्या ओरडण्याचा आवाज येत आहे’. व्हिडिओमधील दिसणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचला आहे. त्याच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याने सुरक्षित असल्याची दिली आहे.

Shocking Incident : जमिनीचा वाद, भर बाजारात माय-लेकीला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

पंतप्रधान नरेंद्र मोदींची संतप्त प्रतिक्रिया

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना शिक्षा होईल. त्यांना सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. काश्मीरमधील या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणती पावले उचणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

 

संपुर्ण गोळीबार थरार व्हिडिओ येथे पाहा

 

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!