Guardian Minister : पालकमंत्रीपदांचा तिढा अखेर सुटला! 11 जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, पुण्याचे कारभारी अजितदादाच; तर चंद्रकांत पाटील..
मागील अनेक दिवसांपासून राज्यातील पालकमंत्री नियुक्तीचा तिढा सुटत नव्हता. आणि त्यामुळे स्वातंत्र्य दिनी देखील अनेक ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी झेंडावंदन केलं होतं. तर पुण्याच्या पालकमंत्रीपदी कोण असणार, असाही पेच होता. परंतु आज हा तिढा सुटला आहे. Guardian Minister
आज अकरा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाली आहे. तर यामध्ये अजित पवार गटाच्या ७ मंत्र्यांना पालकमंत्रीपदं मिळाली आहेत तर पुन्हा स्वतः अजितदादा यांना पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाली आहे.तर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाली आहे, 11 जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर यादी
पहा तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?
Guardian Minister
पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
भंडारा- विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदूरबार- अनिल भा. पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार