दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई; कृषिमंत्री धनंजय मुंडे
पुणे : पावसाळ्यात २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडलेल्या मंडळातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीकविमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईच्या २५ टक्के आगाऊ रक्कम दिवाळीपूर्वी जमा केली जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी दिली.
रब्बी हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खते, पीककर्जाची अडचण भासणार नाही. यंदा आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष घोषित असल्याने, रब्बी हंगामात उत्पादीत होणाऱ्या तृणधान्यांना चांगला भाव मिळवून दिला जाईल, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.