दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई; कृषिमंत्री धनंजय मुंडे

पुणे : पावसाळ्यात २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडलेल्या मंडळातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीकविमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईच्या २५ टक्के आगाऊ रक्कम दिवाळीपूर्वी जमा केली जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी दिली.

साखर संकुल येथे आयोजित रब्बी हंगामाच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुंडे म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढलेल्या सर्व मंडलांमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या निकषांप्रमाणे पंचवीस टक्के आगाऊ भरपाई देण्याचे आदेश विमा कंपन्यांना दिले आहेत. दिवाळीच्या आता भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सरकार प्रयत्नशील आहे. Dhananjay munde

पंतप्रधान पीक विमा योजनेच्या निकषानुसार, एकवीसहून अधिक दिवस पावसाचा खंड असलेल्या भागातील लाभार्थी शेतकऱ्यांना पंचवीस टक्के भरपाई दिली जाते. त्यानुसार अधिसूचित केलेल्या मंडलांमध्ये विमा देताना कंपन्यांना आक्षेप घेण्याच्या अधिकार आहे. मात्र, शेतकऱ्यांना पीक विम्याच्या भरपाईपासून वंचित ठेवले जाणार नाही. काही विमा कंपन्यांचे आक्षेप विभागीय स्तरावर फेटाळण्यात आले असून, काही कंपन्यांनी आता कृषी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अपील केले आहे. ते फेटाळल्यावर शेतकऱ्यांना आगाऊ भरपाई देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

 

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता या शेतकऱ्यांच्या खात्यात यादी पहा

 

पीकविम्यातील गैरप्रकारांना आळा घालणार

राज्यात पाऊस नसतानाही, वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील स्वयंचलित हवामान केंद्रातील पर्जन्यमापकामध्ये पाणी ओतून आपत्कालीन पीक विमा योजनेची भरपाई लाटण्याच्या प्रकार घडला. गृह विभागामार्फत या घटनेचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. पंतप्रधान पीक विमा योजनेतील गैरप्रकारांची नोंद घेण्यात येत असून, शेतकरी असल्याचे भासवून, इतरांच्या शेतजमिनी स्वत:च्या नावे दाखवून पीक विम्याची भरपाई लाटण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही मुंडे म्हणाले. Dhananjay munde

रब्बी हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खते, पीककर्जाची अडचण भासणार नाही. यंदा आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष घोषित असल्याने, रब्बी हंगामात उत्पादीत होणाऱ्या तृणधान्यांना चांगला भाव मिळवून दिला जाईल, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

यादीत नाव पहा 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!