PM Awas yojana: आवास योजनेअंतर्गत तुम्हाला घर मंजूर झालं आहे की नाही? असा करा स्टेटस, यादीत नाव पाहा
Pradhan Mantri Awas Yojana नोंदणीची अंतिम तारीख डिसेंबर 2025 पर्यंत
नोंदणीची अंतिम तारीख डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जर तुम्ही नुकतीच अर्ज प्रक्रिया पूर्ण केली असेल आणि जाणून घ्यायचं असेल की, तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे की नाही? तर ऑनलाइन पद्धतीने खालीलप्रमाणे तपासता येईल.
PM आवास योजनेचा स्टेटस असा तपासा?
Assessment नंबरशिवाय स्टेटस कसा तपासाल?
PMAY ची अधिकृत वेबसाइट उघडा – https://pmaymis.gov.in
Menu > Citizen Assessment या पर्यायावर क्लिक करा
पुढे Search by Name, Mobile No. इत्यादी दोन पर्याय दिसतील
‘Search by Name’ हा पर्याय निवडा
त्यानंतर आपली माहिती भरा : राज्य, जिल्हा, शहर, अर्जदाराचं नाव, वडिलांचं नाव, मोबाईल नंबर
Submit बटनावर क्लिक केल्यावर स्क्रीनवर तुमचा स्टेटस दिसेल.
Assessment नंबर असल्यास स्टेटस कसा तपासाल?
Citizen Assessment मध्ये जाऊन Assessment ID चा पर्याय निवडा
तुमचा Assessment नंबर व मोबाईल नंबर टाका
Submit बटनावर क्लिक करा
तुमचा अर्ज मंजूर झाला का, ते स्टेटस स्क्रीनवर दिसेल.
गावाच्या घरकुल यादीत नाव येथे पाहा