shetkari sanman nidhi या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी सरकारची भेट; खात्यात येणार 4000 हजार रुपये
Pm Kisan Sanman Nidhi: ‘नमो शेतकरी महा सन्मान’ निधी योजनेतील पहिल्या हप्त्यापोटी १७२० कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. दिवाळी आधी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावेत असा प्रयत्न सुरु आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना घोषित केली होती. केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रतिवर्षी एका शेतकऱ्यास ६ हजार रुपये अनुदान मिळते. यात राज्याच्या आणखी ६ हजार इतक्या निधीची भर घालणारी नमो महासन्मान निधी योजना राबविण्यास जून २०२३ मध्ये मान्यता देण्यात आली होती.
केंद्राचा १५ वा हप्ताही लवकरच
– केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (पीएम किसान) १५ वा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
– दोन हजार रुपयांचा हा हप्ता दिवाळीपूर्वी शेतकयांच्या खात्यात जमा होईल, असे सांगण्यात आले. हे पैसे जमा करण्यासाठी ई केवायसी करणे बंधनकारक आहे.
या पात्र शेतकऱ्यांना मिळणार 4000 हजार रुपये यादीत नाव पहा