Student Insurance scheme: महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी एक खास विमा योजना जाहीर केली आहे. शाळकरी आणि पदवी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना असणार आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांच्या एका पालकाला देखील याचा लाभ घेता येईल.

याचा प्रीमियम 20 रुपयांपासून सुरू होईल. यामध्ये वैद्यकीय तसेच अपघाती विमा संरक्षण मिळणार आहे.

राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने 16 ऑक्टोबर रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. पीटीआयने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं. या निर्णयानुसार, ही विमा योजना सरकारी किंवा अनुदानित महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना लागू असेल.

“20 रुपये प्रीमिमय भरुन एका विद्यार्थ्याला एक लाख रुपयांचे वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण मिळेल. ही पॉलिसी एका वर्षासाठी लागू असेल. तर 62 रुपये प्रीमियममध्ये याच कालावधीसाठी 5 लाख रुपये कव्हरेज मिळेल. अपघातानंतर उपचारांसाठी 2 लाख रुपयांपर्यंतचे मेडिकल कव्हरेज हवे असल्यास, 422 रुपये प्रीमियम भरावा लागेल.” असं या आदेशात म्हटलं आहे.

यात पुढे म्हटलंय, “प्राथमिक विमाधारक सदस्य हा महाराष्ट्राच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत संलग्न, संबद्ध, प्रशासित, वर्गीकृत असलेल्या महाविद्यालये, संस्था किंवा विद्यापीठांमध्ये शिकणारा विद्यार्थी असणे आवश्यक आहे. सेकंडरी विमा सदस्य हा विद्यार्थ्याचा शाळा किंवा कॉलेजमधील प्रवेश अर्जावर नोंदणी असलेला पालक असेल.”

या योजनेसाठी ICICI Lombard इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि नॅशनल इन्शुरन्स कॉर्परेशन लिमिटेड या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. 20 रुपये आणि 422 रुपये प्रीमियम असलेल्या योजना आयसीआयसीआयच्या असणार आहेत. तर 62 रुपये प्रीमियम असलेला पाच लाखांचा वैयक्तिक अपघाती विमा नॅचरल इन्शुरन्स कंपनी ऑफर करेल.

या घटनांमध्ये मिळणार नाही कव्हर

आत्महत्या, आत्महत्येचा प्रयत्न, गर्भधारणा किंवा बाळंतपण, मोटार रॅली किंवा साहसी खेळांमध्ये सहभाग, गृहयुद्धात सहभाग, नक्षलवादी हल्ला वगळता झालेले इतर दहशतवादी हल्ले, दारुच्या प्रभावाखाली झालेली दुर्घटना, ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक पदार्थांचे सेवन, विमा लाभार्थीकडून हत्या, न्यूक्लिअर रेडिएशन अशा घटनांमध्ये विद्यार्थ्यांना विमा संरक्षण मिळणार नाही.

गावानुसार घरकुल यादी जाहीर येथे पहा ऑनलाईन

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!